Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांचं अर्थमंत्री सीतारामन यांना पत्र! केली महत्त्वाची मागणी

Murlidhar Mohol: मोहोळ हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांनी पत्रातून नेमकी काय मागणी केली आहे? जाणून घ्या
Nirmaa Sitharaman_Murlidhar Mohol
Nirmaa Sitharaman_Murlidhar Mohol
Published on
Updated on

Mulridhar Mohol: पुण्याचे खासदार तथा केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्याकडे पत्राद्वारे महत्त्वाची मागणी केली आहे. गेल्या काही काळामध्ये केंद्र सरकारकडून अनेक गोष्टींवरचा जीएसटी माफ करण्यात आला आहे. त्यानुसार, आणखी काही गोष्टींवर जीएसटी कमी करण्यासंदर्भात सीतारामन यांना पत्र दिले आहे.

Nirmaa Sitharaman_Murlidhar Mohol
Nagpur Election: ठाकरेंच्या शिवसेनेचा शहरप्रमुख काँग्रेसमध्ये! मनपा निवडणुकीपूर्वीच तीन प्रमुख उमेदवार पळवले

पुस्तक व कागदावर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर (GST) दर कमी करण्याची मागणी प्रकाशन आणि शैक्षणिक क्षेत्राकडून जोर धरत आहे. याबाबतची मागणी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देखील करण्यात आली होती मागणीची दखल घेत मुरलीधर मोहोळ यांनी निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवला आहे.

मोहोळ यांनी पत्रात म्हटलं की, "कागद आणि संबंधित साहित्यावरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे पुस्तकांच्या किंमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीचा परिणाम थेट विद्यार्थी, पालक, लेखक, तसेच लघु आणि मध्यम प्रकाशन उद्योगांवर होत आहे. कोविडनंतर अजूनही सावरण्याच्या टप्प्यात असलेला प्रकाशन व्यवसाय या वाढलेल्या करामुळे पुन्हा संकटात सापडू शकतो, त्यामुळे जीएसटी वाढीचा पुनर्विचार करावा अशी विनंती करत आहे"

Nirmaa Sitharaman_Murlidhar Mohol
Sandip Kshirsagar : बीडमध्ये पंकजा मुंडेचा मोठा डाव; आमदार संदीप क्षीरसागर यांचा सख्खा भाऊच भाजपच्या वाटेवर!

पत्रात त्यांनी पुढे म्हटलं की, “पुस्तके ही केवळ वस्तू नसून ती ज्ञान, शिक्षण आणि संस्कृतीचा पाया आहेत. अशा परिस्थितीत पुस्तकांवरील जीएसटी दर कमी करून पुन्हा १२ टक्क्यांवर आणावेत किंवा शैक्षणिक वापरासाठी असलेल्या कागद व पुस्तकांना करातून पूर्णतः सूट द्यावी. जीएसटी कमी केल्यास प्रकाशन व मुद्रण उद्योगाला पुनरुज्जीवन मिळेल, पुस्तके व शैक्षणिक साहित्य सर्वांसाठी परवडणारे राहतील आणि 'विकसित भारत' या ज्ञानाधिष्ठित ध्येयाला चालना मिळेल, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. शिक्षण आणि प्रकाशन क्षेत्र ही ज्ञानाधारित समाजाची दोन महत्त्वाची स्तंभ आहेत. या क्षेत्रावर वाढत्या कराचा बोजा नको, अशी विनंती मोहोळ यांनी पत्रात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com