मुळशी धरणाचे पाणी पुण्याला मिळणार नाही : जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती

Pune Water Supply : पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावरून विधानसभेत चर्चा
जयंत पाटील
जयंत पाटील
Published on
Updated on

मुंबई : पुणे जिल्ह्यातील (Pune District) मावळ व मुळशी तालुक्यातील विविध धरणांच्या प्रश्नांविषयी विधानसभेत लक्षवेधी आज मांडली गेली. टाटा कंपनीच्या (Tata Power) ताब्यातील धरणांचे पाणी हे पश्चिमकडे वळविण्यात आले असून ते पाणी पुणे शहराला आणि जिल्ह्याला मिळावे, अशी आग्रही मागणी आमदार राहुल कुल (Rahul Kul), सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी केली. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह यांनीही हे पाणी मराठवाड्याला उपयोगी पडणार असल्याचे स्पष्ट केले.

या लक्षवेधीवर जलसंपदा जयंत पाटील यांनी उत्तर देताना ही पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविणे आता शक्य नाही. मागील सरकारच्या काळात भावे समिती नेमली होती. या समितीने असा अहवाल दिला होता. या समितीच्या म्हणण्यानुसार १९२०-३० सालादरम्यान पुणे जिल्ह्यातील या धरणांचे पाणी खाली कोकणात वळवून वीज निर्मिती सुरू केली होती. आधीच ४२.६० टीएमसी पाणी धरणातून खाली उतरवून वीज निर्मिती होत असल्याने पाण्याला पुन्हा पूर्वेकडे वळवू नये. या समितीने असेही सुचवले आहे की. या धरणाच्या खाली जे पाणी गेले आहे त्या पाण्याचाही वापर सुनिश्चित झाला आहे.

जयंत पाटील
सभागृहात पेन ड्राईव्ह, भंडाऱ्यातील ‘त्या’ महसूल अधिकाऱ्यावर कारवाई होणार?

या पाण्यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये देखील सुर्वे समिती स्थापन करून ६ बैठका घेण्यात आल्या. या समितीच्या म्हणण्यानुसार कृष्णेच्या पाणीवाटपासाठीचा दुसरा लवाद जाहीर झाला आहे. मात्र तो नोटीफाय झालेला नाही. नोटीफाय झाल्याशिवाय जर निर्णय घेतला गेला तर त्याचा परिणाम लवादाच्या निर्णयावर होऊ शकतो. त्यामुळे नोटीफाय झाल्यानंतर त्याबद्दल विचार करावा, अशी माहिती त्यांनी दिली.

पुणे शहराच्या पाण्याचा विषयही यावेळी उपस्थित केला गेला. पुणे शहराला ११.५ टीएमसी पाणी देणे अभिप्रेत आहे. पण शहरात २२-२३ टीएमसी पाण्याचा वापर आहे. पुणे हे महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे शहराला पाण्याचे निर्बंध घालणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

जयंत पाटील
अजितदादा तीनच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनवर पोचवणार; अशी केलीय तयारी

मात्र पाण्याचा पुनर्वापर मनपाने करायला हवा. ५ वर्षे मनपाला संधी होती, मात्र यात हे काम गेले नाही. येत्या काळात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर ही कामगिरी करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com