Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन घोटाळ्यातून उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का? हायकोर्टाच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं स्पष्टीकरण

Devendra Fadnavis On Parth Pawar Inquiry : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानी यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला असताना आणि न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली असताना थेट उच्च न्यायालयात आल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
Police files related to the Mundhwa land scam are reviewed as the court questions why Parth Pawar’s name is missing. Ongoing investigation highlights legal scrutiny.
Police files related to the Mundhwa land scam are reviewed as the court questions why Parth Pawar’s name is missing. Ongoing investigation highlights legal scrutiny.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 Dec : पुण्यातील मुंढवा जमीन आर्थिक घोटाळा प्रकरणी दाखल गुन्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाचा समावेश का नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला.

शिवाय पार्थ यांच्या नावाचा उल्लेख न करता पुणे पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असंही न्यायालयाने पोलिसांना विचारलं. त्यावर पोलिलसांनी या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं.

मात्र, पोलिसांकडून अशीच उत्तर दिली जात आहेत. पण या प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव का नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही, असा सवाल दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

Police files related to the Mundhwa land scam are reviewed as the court questions why Parth Pawar’s name is missing. Ongoing investigation highlights legal scrutiny.
BJP Politics : भाजपमध्ये अस्वस्थता! पक्ष निष्ठावंतांचा की आयात उमेदवारांचा? महापालिका निवडणुकीच्या रणनीतीमुळे चिंता वाढली

अशातच आता अजित पवारांच्या मुलावर काही कारवाई होणार का या संदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी राज्य सरकार कोर्टात योग्य उत्तर देईल, असं म्हटलं आहे. फडणवीस म्हणाले, 'कोर्टाने काय म्हटलं ते मी पाहिलं नाही.

मात्र, सरकारकडून कोर्टात योग्य उत्तर सादर केलं जाईल. याप्रकरणी कोणालाही वाचवायचं नाही ही सरकारची भूमिका असू आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार याची सगळी माहिती आम्ही न्यायालयात देऊ, अंसं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Police files related to the Mundhwa land scam are reviewed as the court questions why Parth Pawar’s name is missing. Ongoing investigation highlights legal scrutiny.
Shahaji Patil: शहाजीबापू अन् भाजपमध्ये अखेर हातमिळवणी; दोन जागा केल्या बिनविरोध

दरम्यान, मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शीतल तेजवानी यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला असताना आणि न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली असताना थेट उच्च न्यायालयात आल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर वकिलांनी याचिका मागे घेत असल्याची माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com