Schools Holiday News : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पालकांना गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. मकरसंक्रात आणि निवडणूक मतदान यामुळे सलग सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे. एक दोन नव्हे तर सलग पाच दिवस विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फक्त शुक्रवारी (ता.16) बाबत शासन काय निर्णय घेणार याकडे पालकांचे लक्ष आहे.
या आठवड्यात बुधवारी (ता.14) मकरसंक्राती निमित्त शाळांना सुट्टी असणार आहे. तर, गुरुवारी (त.15) महापालिका निवडणूक असल्याने शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याकारणाने या दिवशी देखील महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस शाळा बंद राहणार आहे.
शुक्रवारी (ता.16) मतमोजणी आहे. मात्र, त्या दिवशी शाळांच्या सुट्टीबाबत निर्णय झालेला नाही. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी शुक्रवारी शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली आहे. कारण शिक्षण इलेक्शन ड्यूटीसाठी गुरुवारी शिक्षक बाहेर असतात. त्यामुळे शुक्रवारी त्यांना लगेच शाळेत येणे शक्य होत नाही. तसेच शाळेत मतदान केंद्र असल्याने आणि मतदान उशीरापर्यंत सुरू असल्याने शाळेतील स्वच्छता आणि इतर कामांसाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.
सूर्यवंशी यांची मागणी मान्य झाली तर शुक्रवारी देखील सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शनिवारी (ता.17) आणि रविवारची (ता.18) सुट्टी देखील जोडून येत असल्याने विद्यार्थ्यांना बुधवार ते रविवार असे सलग पाच दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तब्बल 29 महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. जर, शुक्रवारी (ता.16) सुट्टी जाहीर केली तर विद्यार्थ्यांना सलग पाच दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही. दरम्यान, बुधवार, गुरुवार सुट्टी असल्याने शुक्रवारी मुलांना रजा घेण्यास सांगून बाहेर गावी जाण्याचा प्लॅन काही पालक आखत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.