Murlidhar Mohol : मंत्रि‍पद मिळताच काही तासांतच पुण्यात वादाची ठिणगी; सुळेंनी डिवचलं, मोहोळांचाही जशास तसा पलटवार

Supriya Sule and Hinjewadi IT Park : पुण्याला मंत्रिपद मिळाले त्याचा आनंद आहे. पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा, एवढीच अपेक्षा सुळेंनी व्यक्त केली आहे
Supriya Sule, Murlidhar Moho
Supriya Sule, Murlidhar MohoSarkarnama

Pune Political News : पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळांना पंतप्रधान मोदींच्या टीममध्ये सहभागी करून घेण्यात आले. यामुळे पुण्याचा मंत्रिपदाचा तब्बल २८ वर्षांचा दुष्काळ संपल्याची भावना व्यक्त होत आहे. आता मंत्रिपद मिळाल्याने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मोहोळ यांना हिंजवडी आयटी पार्कची जाणीव करून देत खोचक प्रश्न केला. त्यावर चारवेळा खासदार झालेल्या सुळेंना मोहळांनीही जशास तसे उत्तर दिले आहे.

पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मोहोळ यांना लक्ष्य केले आहे. हिंजवडीमधील 35 ते 40 आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर जात आहेत. आता पुण्याला मंत्रिपद मिळाले आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा, एवढीच अपेक्षा आहे, असा टोला खासदार सुळेंनी मंत्री मोहोळांना नाव न घेता लगावला.

या टीकेला मंत्री मोहोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुळेंचे Supriya Sule आभार मानत सडेतोड उत्तर दिले आहे. सुप्रियाताई, शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे. पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.

Supriya Sule, Murlidhar Moho
Supriya Sule On Murlidhar Mohol : पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा ठेकेदारांना होऊ नये, खासदार सुळेंचा टोला !

ताई, आपली 'मळमळ' आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो. आता उरला प्रश्न ठेकदारांचा. तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू बोलून स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही. अशी टीका मोहोळ यांनी केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Supriya Sule, Murlidhar Moho
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घ्या अन्‌ मंत्री करा; पुणे शहर राष्ट्रवादीचा ठराव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com