Namami Gange Project: पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी 'नमामि गंगा प्रकल्प' पुण्यात उभारला जाणार

Namami Gange News: पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी 'नमामि गंगा प्रकल्पाचे' केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे उभारण्यात येणार
Namami Gange Project:
Namami Gange Project:Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी 'नमामि गंगा प्रकल्पाचे' केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहयोगातून उभारण्यात येणार आहे. पुण्यातील मांजरी येथे प्रकल्पाचे संशोधन, प्रात्यक्षिक आणि तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात पत्रकार परिषद झाली.

कुलगुरू डॉ.पाटील म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असणाऱ्या क्लीन गंगा मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या पर्यावरण विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे 25 कोटी रुपयांचा प्रकल्प मांजरी (जि.पुणे) येथील साडेबारा एकर क्षेत्र अंतर्गत करण्यात येणार आहे. देशांतर्गत प्रवाही नद्या प्रदूषित होणार नाहीत, यासाठी हा 'नमामि गंगा प्रकल्प' आहे. पर्यावरण संरक्षण हा जागतिक प्रश्न गंभीर बनला असून हा प्रकल्प विशेष महत्त्वाचा आहे", असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Namami Gange Project:
PMC Budget : भाजपचे लोकसभा इलेक्शन बजेट आयुक्तांच्या पोतडीतून .....

देशांतर्गत प्रवाही नद्या प्रदूषित होणार नाहीत, यासाठी हा 'नमामि गंगे प्रकल्प' आहे. आयआयटी कानपूर व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यात जानेवारीअखेर पर्यंत सामंजस्य करार होईल. देशातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे या प्रकल्पात समाविष्ट होणारे पहिलेच कृषी विद्यापीठ आहे.

कृषी विद्यापीठातील एम.एस्सी, पी.एचडी संशोधकांना संशोधनासाठी नदी प्रदूषण, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने विषय दिले जातील. हा प्रकल्प दीर्घ काळ चालणार आहे. संशोधन, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण या तिन्ही अंगाने हा प्रकल्प पथदर्शक प्रकल्प ठरेल. नद्यांचे प्रदूषण कमी करणे, नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणा यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर राहणार आहे.

कुलगुरू डॉ. पाटील यांनी कृषी विद्यापीठ आणि केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात आगामी पाच वर्षात 15 हजार ड्रोन दिले जाणार आहेत. ड्रोन प्रशिक्षण संस्थेला केंद्राची मान्यता मिळालेले देशातील महात्मा फुले कृषी विद्यापीठे पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे. आगामी काळात 12 हजार जणांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्याचे आव्हान कृषी विद्यापीठाने स्वीकारल्याचे सांगितले.

सातारा जिल्ह्यात खोडवा पिकाचे उत्पादन एकरी 100 टन उत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सातारा जिल्हा बँक, मिटकॉन आणि सातारा जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांवर सामंजस्य करार केला आहे. उसासाठी कार्बन क्रेडिट मिळणार असून मिटकॉनतर्फे शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे आर्थिक लाभ मिळणार आहेत.

कृषी विद्यापीठ कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रकरणाचा पूर्णपणे निपटारा आपल्या काळात झाला. खूप प्रकरणे सहा महिन्यापेक्षाही अधिक काळ प्रलंबित होती. कृषी विद्यापीठ कर्मचारी भरतीचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याचेही कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले.

(Edited by- Ganesh Thombare)

Namami Gange Project:
NCP Crisis News: राजकीय पक्षांना आगामी निवडणुकांचे वेध; शहर कार्यकारिणी जाहीर करण्याचा लावला धडाका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com