Jalgaon: शिंदे गटात गेलेल्या चाळीस आमदारांच्या विरोधात कायद्याचा लढा आहे, त्यामुळे सर्व आमदार घरीच बसणार आहेत, असे विधान ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलं आहे, या विधानाला शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर जळगावात माध्यमांशी बोलत होते.
"संजय राऊत हे मोठे ज्योतिषी आहेत, मात्र त्यांचे ज्योतिष्य नेहमीच खोटं ठरत. त्यांनी ही ज्योतिष विद्या अधिक सबळ करून घेतली पाहिजे," असे केसरकर म्हणाले. राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
"जे जे महाराष्ट्राच्या वाट्याला आडव्या आले ते याच मातीत गाडले गेले. दोन गुजराती नक्कीच गाडले जातील," अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यावर दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया देत राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
"संजय राऊत हे स्वत:ला महाराष्ट्र म्हणून घेत आहेत. पण संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र खूप मोठा आहे. जनतेचा महाराष्ट्र हा राऊतांची खासगी मालमत्ता नाही," असा टोला केसरकरांनी राऊतांना लगावला.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीचा मुद्दा चर्चेत आहे. यावर दीपक केसरकरांनी भाष्य केलं आहे. "आर्थिक मागास प्रवर्गाच आरक्षणाचा पूर्ण फायदा शिक्षक भरतीतील उमेदवारांना मिळणार आहे. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र त्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळेल.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज सकाळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली. गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी ही भेट झाली. काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास पाटील यांचं निधन झालं होतं. केसरकरांनी गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयावर चर्चा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.