
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीची (PMC Election) उत्सुकता आता शिगेला पोहचू लागली आहे. अद्याप निवडणूक कधी होणार हे स्पष्ट नसलं तरी सोमवारी प्रारूप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार धानोरी-विश्रांतवाडी हा पहिला प्रभाग असणार आहे. सर्वाधिक प्रतिक्षा या प्रभागांची हद्द कशी असेल, याची असून एक फेब्रुवारीला रात्री बारा वाजल्यानंतर ती पाहता येणार आहे.
कोणता प्रभाव कसा होणार याची चर्चा सुरू असताना सोमवारी पुणे महापालिकेच्या (PMC) संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे जाहीर झाली आहेत. शहरातील पहिला प्रभाग हा धानोरी-विश्रांतवाडी असून सर्वात शेवटचा 58 क्रमांकाचा प्रभाग कात्रज-गोकुळनगर हा आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या नावानेही सुमारे 10 प्रभाग तयार झालेले आहेत. तसेच यामध्ये प्रस्थापित नगरसेवकांचे, पक्षनेते व पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (PMC Election Update)
राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) महापालिकेला 1 फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती-सूचना घेण्यात येणार असून 2 मार्च पर्यंत अंतिम प्रभाग रचनेचा अहवाल सादर करायचा आहे. महापालिकेची प्रभाग रचना ही वादाची तसेच डावपेचांची झाल्याचे दिसते. पुणे महापालिकेसह निवडणूक आयोगाकडेही अनेक बदल करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे.
राज्यात सर्वात अवघड प्रश्न हा पुण्याचा ठरल्याचेही अधिकारी खासगीत सांगत आहेत. त्यामुळे ही प्रभाग रचना कशी असणार याची उत्सुकता लागलेली आहे.एक फेब्रुवारीला रात्री बारा वाजता महापालिकेच्या संकेतस्थळावर लिंक ओपन करून दिली जाणार आहे. तेथे प्रभाग रचना नाव व चतु:सीमा नकाशा नागरिकांना पाहता येणार आहे त्यापूर्वी महापालिकेच्या संकेतस्थळावर सोमवारी केवळ प्रभागांची नावे जाहीर करण्यात आली.
असे आहेत पुण्यातील प्रभाग :
1. धानोरी – विश्रांतवाडी
2. टिंगरेनगर – संजय पार्क
3. लोहगाव - विमान नगर
4. वाघोली – इऑन आयटी पार्क
5. खराडी – चंदननगर
6. वडगावशेरी
7. कल्याणीनगर – नागपूर चाळ
8. कळस – फुलेनगर
9. येरवडा
10. शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी
11. बोपोडी – पुणे विद्यापीठ
12. औंध – बालेवाडी
13. बाणेर – सुस म्हाळुंगे
14. पाषाण – बावधन बुद्रुक
15. पंचवटी – गोखलेनगर
16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे
17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर
18. शनिवार वाडा – कसबा पेठ
19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल
20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड
21. मुंढवा – घोरपडी
22. मांजरी – शेवाळवाडी
23. साडेसतरानळी – आकाशवाणी
24. मगरपट्टा – साधना विद्यालय
25. हडपसर गावठाण – सातववाडी
26. भीमनगर – रामटेकडी
27. कासेवाडी – हरकानगर
28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट
29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई
30. जयभवानी नगर – केळेवाडी
31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर
32. भुसारी कॉलनी – सुतारदरा
33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी
34. वारजे – कोंढवे धावडे
35. रामनगर – उत्तमनगर शिवणे
36. कर्वेनगर
37. जनता वसाहत – दत्तवाडी
38. शिवदर्शन - पद्मावती
39. मार्केटयार्ड – महर्षी नगर
40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क
41. कोंढवा खुर्द - मिठानगर
42. सय्यदनगर – लुल्लानगर
43. वानवडी – कौसरबाग
44. काळेपडळ – ससाणेनगर
45. फुरसुंगी
46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची
47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
48. अप्पर सुपर इंदिरानगर
49. बालाजीनगर – के के मार्केट
50. सहकारनगर – तळजाई
51. वडगाव – पाचगाव पर्वती
52. नांदेडसिटी – सनसिटी
53. खडकवासला -नऱ्हे
54. धायरी – आंबेगाव
55. धनकवडी – आंबेगाव पठार
56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ
57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर
58. कात्रज – गोकुळनगर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.