नाना पटोले बारामती मतदारसंघात आले आणि कोड्यात बोलून गेले!

काही गोष्टी ह्या इशाऱ्यांनीच बोलायच्या असतात. कारण, हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे.
nana patole
nana patolesarkarnama
Published on
Updated on

पुणे : आपल्या सर्वांची इच्छा आहे की सत्तेचे अंतर काम व्हावे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष प्रथमच वेल्हे भागात आले आहेत, त्यामुळे मी पहिल्यांदाच येथे आलाे आणि सत्तेचे अंतर काम झाले, एवढेचे इशारे मी तुम्हाला करतो. तुम्ही समजदार लोक आहात, त्यामुळे मी पुढचं काही बोलणार नाही. काही गोष्टी ह्या इशाऱ्यांनीच बोलायच्या असतात. कारण, हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. येथे इशाऱ्यानेच बोलावे लागणार आहे, असे काहीसे कोड्यातील भाषण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी वेल्ह्यात केले. (Nana Patole, who came to Baramati constituency for first time, commented on issue of development)

भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या निधीतून विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी प्रदेशाध्यक्ष पटोले हे प्रथमच वेल्हे तालुक्यात आले होते. भूमिपूजनानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात नाना बोलत होते. या वेळी पटोले यांनी अडवळणाचे भाषण केले.

पटोले म्हणाले की, मी प्रथमच बारामती लोकसभा मतदारसंघात आल्यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे की, नाना पटोले काय बोलणार. पण, आम्हाला कोणच्याही ताटातील नको आहे. आम्हाला आमच्या हक्काचे हवे आहे. आमचं आणि तुमचं दुःख सारखंच आहे. मला वाटलं बारामती लोकसभा मतदारसंघात स्वर्ग असेल. येथे कोणतेच प्रश्न नाहीत. माझी आता आमदारकीची पाचवी टर्म आहे. खासदारही झालो. मला वाटलं सगळा पैसा बारामतीकडे जात आहे. पण कुठे आहे, तो पैसा. कुठे गेला निधी, कुठे गेले पाणी हेच कळत नाही. असं कसं होऊ शकतं. हा भाग विकासापासून दूर आहे, या सर्व गोष्टींचे उत्तर आपल्याला मिळायला हवे.

nana patole
नाना पटोले यांनी दिली संग्राम थोपटेंना ‘गुड न्यूज’ : तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार!

महाविकास आघाडी सरकार बनण्याच्या काळात मी, संजय जगताप, संग्राम थोपटे व इतर एकत्र होतो. त्यावेळी आम्हाला फोन आला की सरकार बनतंय. आम्ही पाहिलं तर त्यांच्यासोबत एक नवीन व्यक्ती होता आणि तो पुणे जिल्ह्यातील होता, असे सांगून पटोले यांनी अजित पवार यांच्या भाजपसोबत जाऊन सरकार बनविण्याच्या प्रकारावरही भाष्य केले.

केंद्रात पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेजण हम दो आणि हमारे दो असे म्हणत चौघेजण देशाचा कारभार चालवत आहेत. मोदींनी सरकारी मालकीच्या अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत. उद्या ते कोकण रेल्वेही विकायला काढतील. पण, काँग्रेसने त्यावेळी सर्वसामान्यांचा विचार करून वेगवेगळ्या संस्था उभारल्या. म्हणूनच भोर-वेल्हे या मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा अनेक वादळानंतरही फडकत राहिला. पुणे जिल्ह्यात काँग्रेसने दुसऱ्याला मागावं हे कदापि सहन केले जाणार नाही. पुणे जिल्ह्यात आगामी काळात काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार आहे, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला दिला.

nana patole
आमदार शिंदेच्या आरोपाबाबत जयंत पाटलांची सावध भूमिका

सरसकट कर्जमाफी करण्याच्या अटीवरच काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आणि त्यानंतरच राज्यात तीन पक्षाचे सरकार आले. विशेष म्हणजे कोणतीही निवडणूक नसता आमच्या सरकारने पहिल्याच अधिवेशनात कर्जमाफी जाहीर केली. अगोदरच्या भाजप सरकारने मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफी जाहीर केली होती. ती करताना पती-पत्नीला रांगेत उभे केले. पण, जे नियमित कर्ज भरतात, त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्याबाबत येत्या अधिवेशनात निर्णय घ्यावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत, असेही नाना यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या मताचे विभाजन करून भाजपला फायदा करून देणाऱ्या व्यवस्थेलाही ओळखले पाहिजे. भाजपवाल्यांना विशेषतः कोल्हापूरहून पुण्यात आलेले आमदार चंद्रकांत पाटील यांना दर महिन्याला आपलं सरकार आल्याचं स्वप्न पडतं. या भाजपच्या नेत्यांनी आता एसटी कागमारांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. त्या कामगारांना आंदोलनाला उतरविले. एसटी कामारांना शासकीय सेवेत घ्या, अशी मागणी आहे. तीच आमचीही मागणी आहे. एसटी कामागारांवर अन्याय आहे. पण ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहेत, त्यांच्या पक्षाचे केंद्रातील लोक रेल्वेचे खासगीकरण करत आहेत आणि महाराष्ट्रात सांगत आहेत की एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्यांनीही मागणी फेटाळून लावली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

nana patole
ते मंत्री आहेत, त्यांना हे शोभतं का? उच्च न्यायालयाचं मलिकांकडं बोट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आम्ही लढणारे आहोत. बाकीच्यांना काही बोलू द्या. पण, संग्राम थोपटे यांच्यासारखा मावळा जोमाने लढतो आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा फक्त काँग्रेस पक्षच करू शकतो. शेतीआधारित उद्योग सुरू करू आणि आमचा भाग मागास राहणार नाही, याची काळजी घेऊ, असेही नाना पटोले यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com