Prakash Ambedkar: बिहारमध्ये काँग्रेसला 'वंचित' ठेवा; इंडिया आघाडीशी सूत जुळण्याआधीच आंबेडकरांनी डिवचलं

Loksabha Election 2024 : ...त्यामुळे आंबेडकरांचा सल्ला काँग्रेस कितपत गृहीत धरतो हे देखील पाहण्यासारखे ठरेल.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar NewsSarkarnama

सचिन देशपांडे -

Prakash Ambedkar News : देशाच्या राजकारणात ‘बिग ब्रदर’ कोण हे ठरविण्यापेक्षा केंद्रातील मोदी सरकारला पाडणे, हे टार्गेट असले पाहिजे. या मुख्य हेतूने वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी बिहारमध्ये 40 जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने केवळ 5 जागांवर लढण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी आकडेवारीचा संदर्भ देत काँग्रेसला बिहारमध्ये जनाधार नसल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावला. देशात मोदींच्या पराभवासाठी काँग्रेसने ही भूमिका घ्यावी, असा आग्रही सूर त्यांनी लावला आहे.

काँग्रेसने नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबत घेतलेल्या ऑनलाइन मिटिंगमध्ये बिहार लोकसभा निवडणुकीवर चर्चा रंगली आहे. बिहारमधील दलित मतदारांचा एकंदर कल पाहता मोदींना पराभूत करण्यासाठी महागठबंधनची भूमिका महत्वाची असेल. काँग्रेसने बिहारमध्ये 5 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढू नये, असा सल्ला वंचित नेते आंबेडकर यांनी दिला आहे. अद्याप वंचित ही 'इंडिया' आघाडीच्या महागठबंधनात सहभागी नसताना वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट काँग्रेसलाच सल्ला दिला आहे. त्यामुळे आंबेडकरांचा सल्ला काँग्रेस कितपत गृहीत धरतो हे देखील पाहण्यासारखे ठरेल.

2019 मध्ये काँग्रेस (Congress) 9 जागांवर लढली. तेव्हा केवळ 1 जागेवर ( किशनगंज) विजय मिळाला. तर 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल यांना 70 जागा मागितल्या होत्या. राजदने त्या त्यांना दिल्या पण, विधानसभा निवडणूकीत केवळ 19 जागांवर काँग्रेस विजयी झाली. देशाच्या भविष्यासाठी बिहारमध्ये काँग्रेसने 5 जागांवर उमेदवार उभे करावे आणि बिहारच्या 40 जागांवर विजय संपादीत करावा असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. हा सल्ला देताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 'बिग ब्रदर' याचा विचार न करता मोदींना हरवणे हे मोठे ध्येय निश्चित करण्याची गरज व्यक्त केली.

आंबेडकरांचा सल्ला महत्वाचा कसा…

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. यात नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडे 16 तर भाजपाकडे 17 जागा आहे. बिहार मध्ये भाजपाकडे असलेल्या 17 जागांवर इंडिया आघाडीचे मतविभाजन टाळण्याची गरज आहे. इतकेच नाही तर बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कुठल्या ही परिस्थितीत नाराज करु नये, अशीच काय ती भूमिका काँग्रेसची आहे. भविष्यात बिहारमधून काँग्रेसची न्याय यात्रा जाणार आहे.

संयुक्त जनता दलाचे अध्यक्षपद नितीश कुमार यांच्याकडे आले आहे. त्याच बरोबर त्यांना इंडिया आघाडीचे संयोजक या महत्वाच्या पदावर नियुक्ती व्हावी, अशी चर्चा रंगली आहे. बुधवारी आंबेडकरांनी थेट बिहारमध्ये काँग्रेसने 5 जागावर निवडणूक लढविण्याची वादग्रस्त सल्ला दिला आहे.

संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार, राजद आणि डाव्या पक्षाला बिहारमध्ये काँग्रेसने अधिक जागा सोडल्यास त्याचा थेट फायदा इंडिया आघाडीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा गंभीर विचार काँग्रेसला करावा लागेल हे निश्चित. पण, हा सल्ला देताना आंबेडकर यांची नितीश कुमार यांच्यासोबतची जवळीक भविष्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Prakash Ambedkar News
Ram Mandir Ayodhya : 22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मांसबंदी? भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com