Pune News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निकराचा लढा उभारल्यानंतर आता मराठा समाजातील तरुण आक्रमक होताना दिसत आहेत. यातच केंद्रातील मोदी सरकारचे मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांच्या एका वक्तव्यामुळे मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. '९६ कुळी मराठा कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. ९६ कुळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा,' असे वक्तव्य राणे यांनी केले होते. यावरून आता मराठा तरुण राणेंविरोधात आक्रमक होत, निषेध नोंदवताना दिसत आहेत. (Latest Marathi News)
'मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या,' अशी मागणी करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेच्या अगदी विपरित वक्तव्य नारायण राणे यांचे आले आहे. एकेकाळी मराठी आरक्षणाच्या समितीवर असणारे राणेंची ही भूमिका मराठा तरुणांना रुचलेले नाही. त्यांच्या विरोधात मराठा समाजातील तरुणांच्या भावना तीव्र झाले आहेत. कठोर शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला आहे.
मनोज जरांगे यांच्या राजगुरूनगर येथील सभास्थळी 'सरकारनामा'चे प्रतिनिधी पोहाेचले होते. या वेळी राणेंच्या वक्तव्यावर तरुणांना प्रतिक्रिया विचारले असता, त्यावेळी त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. '९६ कुळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा,' राणेंच्या या वक्तव्यावर तरुण म्हणाले, "नारायण राणे हे नेपाळी आहेत का? नारायण राणे मराठा समाजाचे आहेत, की दुसऱ्या समाजाचे आहेत? अशा कठोर शब्दांत तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"सर्व राजकारण्यांनी आता बेताल वक्तव्ये करणे थांबावावे, आता सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे जाहीर करावं. मराठा समाजातील एवढे खासदार-आमदार झाले, पण एकही खासदार आमचा नाही, एकही आमदार आमचा नाही. आरक्षण नाही दिलं तर यांना राज्यच काय, देश सोडून पळावं लागेल. या लोकांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा आक्रमक भावना तरुणांनी व्यक्त केल्या.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.