Bihar : लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत न मिळाल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे किंगमेकर ठरले आहेत. हे सरकार फारकाळ टिकणार नाही, असा दावा इंडिया आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही शुक्रवारी मोदी सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. केंद्रातील सरकार कमकुवत असून ऑगस्ट महिन्यात हे सरकार कोसळेल, असा दावा लालूंनी केला आहे.
लालूंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सुचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत आरजेडीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तर लोकसभा निवडणुकीतही पक्षाच्या मतांची टक्केवारी 9 टक्क्यांनी वाढली आहे. तर एनडीएची मतं कमी झाले आहेत. पक्षाला मागील लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा मिळाली होती. यावेळी हा आकडा नऊवर पोहचला आहे.
भाजपवर टीका करताना तेजस्वी यादव म्हणाले, आम्ही जातनिहाय सर्वेक्षण करण्याचे आश्वासन पूर्ण केले होते. पण भाजपने सत्तेत येताच ते रोखले. भाजप संविधान आणि आरक्षणविरोधी आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्या दिल्या. ते डबल इंजिनचे सरकार असल्याचा दावा करत आहेत. पण त्यानंतरही एक डझनहून अधिक पूल पडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.