Narendra Modi Sabha In Pune : पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे पुण्यात निर्बंध, नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना !

Pune Lok Sabha Constituency : शहर परिसरात हॉट बलून सफारी, पॅराग्लायडिंग, ड्रोन, मायक्रोलाइट एअरोप्लेन या प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध..
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी पंतप्रधान मोदी यांची कोल्हापूर येथे सभा झाली, तर सोमवारी 29 एप्रिलला पुण्यात मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. रेसकोर्स मैदानावर ही सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या पुणे दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 29 आणि 30 एप्रिल असे दोन दिवस हे निर्बंध असणार आहेत. या दोन्ही दिवशी पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध लावण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात येणार आहेत. त्यांची प्रचार सभा होणार असून, रोड शोदेखील घेण्याचे नियोजन महायुतीकडून करण्यात आले आहे. त्यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यानिमित्त अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात हॉट बलून सफारी, पॅराग्लायडिंग, ड्रोन, मायक्रोलाइट एअरोप्लेन या प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचे आदेश जिल्हाधिकारी (Collector) डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता 1860 कलम 188 च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी दिवसे यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
PM Narendra Modi : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात मोदींच्या चार दिवसांत नऊ सभा !

मोदी यांच्या रेसकोर्स मैदानावर होणाऱ्या सभेसाठी महायुतीकडून मोठे आयोजन करण्यात येत आहे. तसेच शहर भाजपचे (BJP) पदाधिकारी आणि नेत्यांच्यादेखील अनेक बैठका सुरू आहेत. प्रत्येक स्थानिक नेत्यांकडून यासाठी तयारी केली जात आहे. मोठ्या संख्येने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या सभेसाठी हजर राहावे, अशा सूचना दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार हे उमेदवार महायुतीकडून निवडणूक लढवित आहेत.

पाच वर्षांपूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी पुण्यात प्रचार सभा घेतली होती. एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ही सभा झाली होती. या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी सभा घ्यावी, अशी विनंती भाजपसह महायुतीत सहभागी असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यात मुक्काम असणार आहे. रेसकोर्स येथील सभेनंतर पंतप्रधान मोदी हे राजभवन येथे मुक्कामासाठी जातील. दुसऱ्या दिवशी मंगळवारी 30 एप्रिलला माढा येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी नरेंद्र मोदी जाणार आहेत.

R

Narendra Modi
Sharad Pawar Satara : उदयनराजेंना खुन्नस; शरद पवारांनी दुसऱ्यांदा उडवली कॉलर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com