Narendra Modi News : पंतप्रधानांना पुण्यातून मिळणार या दोन भेटवस्तू ; मोदींसाठी खास ‘दिग्विजय पगडी’ !

Pune Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे..
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेसकोर्स येथे सभेला संबोधित करणार असून, या वेळी मोदींच्या स्वागतासाठी खास दिग्विजय पगडी महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पेनतून मुरुडकर झेंडेवाले यांनी साकारली आहे. पाहाताक्षणी डोळ्यात भरणारी ही पगडी पारंपरिक पुरातन पद्धतीने तयार केली आहे.

पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आजवर विविध पगडी घालून स्वागत करण्यात आले असून, यंदाची पगडीही चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा आहे. दिग्विजयाला साजेशा सात घोड्यांच्या मंचकाची संकल्पना यातून प्रतीत होते. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी नाव दिले गेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Narendra Modi In Pune : या लवकर, बस आली! मोदींच्या सभेसाठी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याचा मेसेज व्हायरल

मोहोळ म्हणाले, ‘मोदीजींचे आजवर अनेक पुणे दौरे झाले, त्यात त्यांचे विविध पगड्या घालून स्वागत केले आहे. पण आजची पगडी निश्चितच विशेष आहे. दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी आपल्या मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी आहे’. लोकसभा (Loksabha) निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. राज्यात महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर महायुतीत सहभागी झाली आहे.

छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा देऊन होणार स्वागत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या स्वागतासाठी खास पगडी साकारल्यानंतर त्यांचे स्वागतही जोरदार केले जाणार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि तलवार भेट देऊन मोदींचे स्वागत करणार असल्याचेही मोहोळ यांनी या वेळी सांगितले. पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, बारामती, शिरूर, मावळ या मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारार्थ रेसकोर्स मैदानात सभा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातच मुक्कामी असणार आहेत. राजभवन येथे त्यांचा मु्क्काम असून, उद्या मंगळवारी पंतप्रधान मोदी हे धाराशिव, लातूर आणि माळशिरस येथे जाहीर सभा घेणार आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Narendra Modi
Prakash Ambedkar News : बारामतीत उमेदवार का दिला नाही? आंबेडकरांनी केला गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com