Video PMO Office : पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगून तरूणीने इतक्या लाखांना गंडवले !

Bundgarden Police Station : सरकारी टेंडर मिळून देण्याच्या बहाण्याने केली फसवणूक; बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
PM Office
PM OfficeSarkarnama

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगून 50 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाचे टेंडर मिळवून देतो, असे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कश्मीरा पवार, गणेश गायकवाड या दोघांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शासनाचे टेंडर मिळवून देतो असे आमिष दाखवित ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी आणि तक्रारदार यांची भेट विधानभवन येथे झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. त्यावरून पोलिसांनी कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड या दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी कश्मीरा पवार यांनी तक्रारदार यांना आपण पंतप्रधान कार्यालयात (PMO) राष्ट्रीय सल्लागार म्हणून काम करत असल्याचे सांगितले.

PM Office
Video Nagpur : लोक चिडले भाजपच्या माजी नगरसेवकाला धो धो धुतलं; पोलिसांत तक्रार दाखल, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

तुम्हाला शासकीय टेंडर मिळवून देतो, असे आमिष तक्रारदार यांना दाखविण्यात आले. याला बळी पडत तक्रारदार यांनी आरोपींना 50 लाख रूपये दिल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार यांचा विश्वास संपादित करण्यासाठी आरोपींनी त्यांना पुण्यातील विधानभवन येथे भेटण्यासाठी बोलाविले होते. तेथे आरोपींनी त्यांच्या व्हॉट्अपवर सरकारी टेंडरचे बनावट कागदपत्रे सुद्धा पाठविली. हे टेंडर मिळाल्यानंतर पैसे कमाविता येतील, या आशेवर तक्रारदार यांनी संबधित आरोपींना पैसे पाठविले.

PM Office
Zadani Land Case : झाडाणी 'कनेक्शन' प्रकरणात आणखी 8 जणांना नोटीस; जीएसटी आयुक्तांसह नातेवाईकांचा समावेश

आरोपींनी तक्रारदारांकडून कधी रोख रक्कम तर कधी आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल 50 लाख रूपयांची रक्कम उकळली. आरोपींना 50 लाख रूपये दिल्यानंतर देखील शासकीय टेंडर मिळत नाही. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी बंडगार्डन पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड या दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामागे नक्की किती जण आहेत. या आरोपींनी अजून कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com