Kolhapur Politics: सप्टेंबरमध्ये निवडणुकांचा धुरळा? नेत्यांचा कस लागणार; गाव पातळीवरचं राजकारण तापणार

Maharashtra Local Body Elections Scheduled for September 2025: काही स्थानिक स्वराज्य संस्था पाच वर्षांपासून, तर काही ठिकाणी दोन ते तीन वर्षांपासून कारभारी नाहीत. आता तेथे नवे कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
Local Body Election
Local Body ElectionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 8 May 2025: येत्या सप्टेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन महानगरपालिका, एक जिल्हा परिषद,आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यंदाचे वर्ष हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी राजकीय इव्हेंट असणार आहे. त्यामुळे गाव पातळीवरचं राजकारण चांगलंच तापणार आहे.

महापालिकांसोबत गाव पातळीवर देखील इर्षा आणि चुरस निर्माण होणार आहे. त्यामुळे यंदाचा सप्टेंबर महिना राजकीय इव्हेंट ठरणार आहे. महानगरपालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेत्यांचा कस लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कोल्हापूरमधील दोन महापालिकांसह दहा नगरपालिका, तीन नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेसह १२ पंचायत समित्यांमध्ये आता निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्था पाच वर्षांपासून, तर काही ठिकाणी दोन ते तीन वर्षांपासून कारभारी नाहीत.

आता तेथे नवे कारभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरुवातीला कोरोनामुळे निवडणुका दोन वर्षे पुढे ढकलल्या गेल्या. आता न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील सर्वच महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

Local Body Election
Operation Sindoor: कुणाच्या शवपेटीवर पाकिस्तानच्या लष्करप्रमुख, राष्ट्रपतींनी अश्रू ढाळले; मारला गेलेला दहशतवादी मसूद, हाफिज की दुसरा कोण?

शासकीय पातळीवर अधिसूचना काढण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पक्षांपेक्षा गटात त्याला महत्त्व असल्याने संपूर्ण जिल्हा राजकीय गटबाजी, कुरघोडी, डावपेच, गनिमी कावा, साम-दाम-दंड-भेद, या विविध राजकीय खेळीने गाजणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी महिन्याभरात या निवडणुकीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने प्रसिध्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने प्रशासकीय हालचालीही गतिमान झाल्या आहेत.

Local Body Election
Operation Sindoor India :पाकिस्तानात एअर स्ट्राईक कसा झाला? कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला? ऑपरेशन सिंदूरचे महत्वाचे मुद्दे

दृष्टिक्षेपात (कंसात मुदत संपलेला कालावधी)

  • जिल्हा परिषद (फेब्रुवारी २०२२)

  • महापालिका-कोल्हापूर (नोव्हेंबर २०२०),

  • इचलकरंजी (डिसेंबर २०२१)

  • पंचायत समिती - १२ तालुके (फेब्रुवारी २०२२)

  • नगरपालिका - जयसिंगपूर, कागल, मुरगूड, पेठवडगाव, कुरुंदवाड,गडहिंग्लज, मलकापूर, पन्हाळा (सर्व ३० डिसेंबर २०२१), हुपरी, शिरोळ (दोन्ही ऑक्टोबर २०२२).

  • नगर पंचायती - आजरा, (मे २०२३), चंदगड (फेब्रुवारी २०२५), हातकणंकले (मार्च २०२४

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com