समीर मेघे कोरोनाबाधित येताच आमदारांचे धाबे दणाणले, पण अजितदादा म्हणतात...

हिवाळी अधिवेशनाचे दोनच दिवस राहिले असून त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Ajit Pawar 

Ajit Pawar 

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाचे भाजप (BJP) आमदार समीर मेघे (Sameer Meghe) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. समीर मेघे यांनी दोन दिवस विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभाग देखील घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पुढे अधिवेशन होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

अजित पवार यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांना मेघे यांच्याविषयी विचारणा करण्यात आली. अधिवेशनावर त्याचा काय परिणाम होणार का, यावर बोलताना पवार म्हणाले, अधिवेशनाचे दोनच दिवस राहिले आहेत. त्यावर असा काय परिणाम होणार आहे. आम्ही काळजी घेत आहोत. पहिल्यांदा आम्हाला आरटीपीसीआर करायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही बुधवार, गुरूवार, शुक्रवारी हजर होतो. आता पुन्हा आरटीपीसीआर करायला सांगितले आहे. जे पॉझिटिव्ह नसतील त्यांनाच अधिवेशनात प्रवेश दिला जाणार आहे, असे पवार यांनी स्पष्ट केलं.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar&nbsp;</p></div>
असा होता हल्ल्याचा कट; व्हिडीओ टाकत पडळकरांनी घेतला मोठा निर्णय

दरम्यान, मेघे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे विधिमंडळातील आमदारांचे धाबे दणाणले आहेत. अधिवेशनासाठी सभागृहात प्रवेश करताना सर्व अधिकारी, कर्मचारी व आमदारांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. तसेच सर्वांना मास्क देखील अनिवार्य करण्यात आलेला आहे. याच नियमांतर्गत समीर मेघे यांची कोरोना चाचणी केली असता आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मेघे सध्या गृहविलगीकरणात असून घरीच उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) शुक्रवारी विधान भवनात (Assembly Winter Session) दाखल झाले. पण त्यांना कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्याने गेटवरच अडवण्यात आले. रिपोर्ट दाखविल्याशिवाय प्रवेश नसल्याचे सांगताच भाई चिडले आणि प्रवेश देण्याचा आग्रह सुरूच ठेवला. शेवटी 'अॅण्टिजेन' करण्याचा पर्याय निवडून त्यानुसार भाईची टेस्ट झाली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यानंतरच्या काही मिनिटांतच भाईना प्रवेश मिळाला.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar&nbsp;</p></div>
मोदींकडून 15 वर्षांपुढील मुलांसाठी लशीची घोषणा, पण DCGI चा निर्णय वेगळाच...

कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने या अधिवेशनात (Assembly Winter session) खबरदारी म्हणून उपाय केले आहेत. त्यामुळे लसीकरण (Vaccination) आणि कोरोना चाचणीशिवाय विधीमंडळात 'नो एन्ट्री' आहे. परंतु, सभागृहात काही बहुतांशी मंत्री, आमदार मास्क न लावत नसल्याचे दिसून येत आहेत. विधीमंडळाच्या आवारातही फिरताना मास्क न लावणाऱ्या मंत्री, आमदारांच्या बेशिस्तपणावर बोट ठेवत, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी सभागृहात नाराजी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com