Bhor Bazar Samiti Result : संग्राम थोपटेंनी राष्ट्रवादीसह सर्वपक्षीयांना ताकद दाखवली : बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय

आमदार संग्राम थोपटे यांच्या रणनीतीमुळे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्या संघर्ष परिवर्तन पॅनेलचा व्हाईट वॉश दिला
Bhor Bazar Samiti Election
Bhor Bazar Samiti ElectionSarkarnama

भोर (जि. पुणे) : भोर (Bhor) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar samiti) निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या (Congress) राजगड कृषी विकास पॅनेलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी झाले. चार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, तर मतदानानंतर १४ उमेदवार विजयी झाले. आमदार संग्राम थोपटे (Sangram thopte) यांच्या रणनीतीमुळे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्या संघर्ष परिवर्तन पॅनेलचा व्हाईट वॉश दिला आणि बाजार समितीवर फक्त कॉग्रेस आणि कॉग्रेसच हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. (Congress again dominates Bhor Bazar Samiti: Victory in all eighteen seats...)

कॉंग्रेसच्या राजगड कृषी विकास पॅनेलचे व्यापारी व आडते मतदारसंघात राजेंद्र दिनकर शेटे(उत्रौली) व नवनाथ विठ्ठल भिलारे(किकवी), अनुसूचीत जाती जमाती मतदारसंघात दिपक दिनकर गायकवाड (महुडे खुर्द) आणि हमाल तोलारी मतदारसंघात विनोद गुलाब खुटवड (नांदगाव) हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Bhor Bazar Samiti Election
Bazar Samiti Election : शिवतारे-जगतापांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नीरेत ९५ टक्के मतदान : युतीच्या प्रचारातंत्राने महाआघाडी सावध

भोर येथील प्राथमिक शिक्षण सहकार भवनामध्ये निवडणूक निरीक्षक तहसीलदार सचिन पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी पी. टी. घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रीया अडीच तासात पार पडली. सुरुवातीला ग्रामपंचायत मतदारसंघात कॉग्रेसच्या राजगड कृषी विकास पॅनेल व विरोधकांच्या संघर्ष परिवर्तन पॅनेलमध्ये काटे की टक्कर होणार असे वाटत होते, परंतु कॉग्रेसच्या उमेदवारांनी दमदार आघाडी घेत विजय मिळवला. विजयानंतर कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Bhor Bazar Samiti Election
Bazar Samiti Election : देवदत्त निकम वळसे-पाटलांना धक्का देणार का? मंचर बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान, निकालाकडे लक्ष

राजगड कृषी विकास पॅनलचे विजयी उमेदवार कंसात गावाचे नाव व मिळालेली मते

सर्वसाधारण सात जागा - आनंदा बाबुराव आंबवले ( कर्नावड, ४३७ ), धनंजय कृष्णा वाडकर( ससेवाडी, ४४४), अंकुश पांडुरंग खंडाळे (येवली,४२०), राजाराम बाबुराव तुपे (वरोडी बुद्रुक, ४५२), निलेश बबन सोनवणे (न्हावी, ४३१), सुरेश वाघू राजिवडे (म्हसर बुद्रुक, ४३४) व भाऊ चंदर मळेकर (मळे, ४४२).

महिला प्रतिनिधी दोन जागा - अनिता दत्तात्रय गावडे (भोलावडे, ४७९) व सुरेखा रमेश कोंडे (केळवडे, ४९५).

इतर मागास एक जागा - ईश्वर बबन पांगारे (वेळू, ४६५).

भटक्या विमुक्त एक जागा - विठ्ठल धोंडीबा गोरे (डेहन, ४६१).

ग्रामपंचायत सर्वसाधारण दोन जागा - महेश अशोक धाडवे (सारोळा, ५९६) व प्रविण विष्णु शिंदे (वेनवडी, ५७१)

आर्थिक दुर्बल घटक एक जागा - शहाजी दिलीप बोरगे (करंदी खेबा, ५५१)

Bhor Bazar Samiti Election
Bazar Samiti Result : मंगळवेढ्यात आवताडेच 'बॉस' : बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर वर्चस्व; राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांना फक्त दोन मते

राष्ट्रवादीची विरोधकांशी युती दळभद्रीच : संग्राम थोपटेंचा हल्लाबोल

भोर तालुक्यातील सहकार क्षेत्र हे कॉंग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी उभे केले आहे सहकारातून तालुक्याचा विकास हा कॉग्रेस पक्षच करू शकतो. हे मतदारांना माहिती आहे. त्यामुळेच मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. याशिवाय राष्ट्रवादीची विरोधकांशी केलेली युती दळभद्रीच असल्याचे सिद्ध झाले आहे, असा हल्लाबोल आमदार संग्राम थोपटे यांनी विजयानंतर विरोधकांवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com