Ajit Pawar News : कार्यकर्त्यांचा अजिदादांना प्रेमाचा सल्ला; दादा म्हणतात अरे सावकाश माझ्या डिक्शनरीत नाही रे...

NCP News : अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Ajit Pawar Viral Video News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) सडेतोड उत्तरे देण्यासाठी परिचित आहेत. कार्यकर्ते अजित पवार यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये कार्यकर्ते अजित पवार यांना हळू जाण्याचे आवाहन करत आहेत.

अजित पवार पुण्यातील वारजेमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अजितदादांना हळू जाण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्त्यांच्या या आवाहनावर अजित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया ही अतिशय बोलकी आहे. घडले असे की अजित पवार गाडीमध्ये बसत असताना कार्यकर्ते काळजीपोटी म्हणाले, दादा सावकाश जाल... त्यावर अजित पवार म्हणाले, अरे सावकाश माझ्या डिक्शनरीत नाही रे... त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हशा पिकला.

Ajit Pawar News
Pune APMC News: बाजार समितीत आमदार मोहिते अ्न शेळकेंची प्रतिष्ठा पणाला; भाजप, काँग्रेस अन् ठाकरे गटाची हातमिळवणी

दरम्यान, अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. त्या चर्चांवर अजित पवार यांनी अनेकवेळा स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, या चर्चा थांबायला तयार नाहीत. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सूलट चर्चा सुरु आहेत. याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, अरे सावकाश माझ्या डिक्शनरीत नाही रे... यावरुन अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसचे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करत राज्य सरकारकडे हरभरा विक्री पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. ट्वीटमध्ये अजित पवार म्हणाले, ९ एप्रिल, २०२३ रोजी हरभरा खरेदी बंद केली. हरभरा विक्रीसाठी फक्त १७ दिवस मिळाले. त्यातले अर्धे दिवस अवकाळी पाऊस आणि सुट्ट्यांनी खाल्ले. शेतकऱ्यांचा हरभरा तसाच पडून आहे.

Ajit Pawar News
Political News : सत्तासंघर्ष : ''सरकार कोसळणार नाही, 16 आमदार अपात्र झाले तरी धोका नाही''

हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ३३५ आणि बाजारात दर ४ हजार ५०० रुपये. हरभऱ्यासाठी लावलेला पैसाही शेतकऱ्यांचा निघत नाही. उलट क्विंटलमागे ८०० रुपयांचा तोटा आहे. हमीभाव आणि सध्याचा बाजारभाव यातली क्विंटलमागे आठशे रुपयांची फरकाची रक्कम सरकारनं हरभरा उत्पादकांना द्यावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com