Sharad Pawar on uniform civil code : समान नागरी कायदाच्या समर्थनावर पवार म्हणाले, "सर्व समुदायांची भूमिका समजून घेतल्यानंतर...

Uniform Civil Code News : समान नागरी कायदा लागू करण्याबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : समान नागरी कायदा लागू करण्याबाबत केंद्रात मोदी सरकारच्या हालचालीला वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समान नागरी संहितेची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

त्यासाठी विधि आयोगाने सर्व सार्वजनिक आणि धार्मिक संघटनांकडून सूचना मागवल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sharad Pawar News
World Cup 2023 : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची रोहित पवारांनी काढली समजूत ; आपणही जरुर या..

"सर्वांची भूमिका स्पष्ट झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. शिख, मुस्लिम व अन्य समाजाबाबतची भूमिका स्पष्ट झाल्यावर राष्ट्रवादी आपली भूमिका स्पष्ट करेल, असे पवार यांनी नमूद केलं.

काँग्रेससारख्या महत्त्वाच्या आणि प्रमुख विरोधी पक्षाने भाजपा सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. समान नागरी कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन देणार का, यावर पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Sharad Pawar News
Sanjay Raut On Fadnavis: पवारांनी डबल गेम केला, असं म्हणणं सोडा.. तुमचा प्रयोग फसला ; राऊतांनी फडणवीसांना फटकारलं..

भारतात सध्या मुस्लीम, ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ आहेत, तर हिंदू सिव्हिल लॉअंतर्गत हिंदू, शिख, जैन आणि बौद्ध समाज येतात. मुस्लीम पर्सनल लॉमध्ये महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर तेवढा अधिकार नाही, जेवढा हिंदू सिव्हिल लॉनुसार महिलांना आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यास लग्न, तलाक आणि संपत्तीचं वाटपही समसमान होईल आणि हीच मोठी अडचण आहे.

  • काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

  • संयुक्त जनता दल, डावे पक्ष तसेच तृणमूल काँग्रेस या पक्षांनीही मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आम आदमी पार्टीने मात्र अद्यापही आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com