PCMC News : ''मराठा आरक्षण आंदोलनावरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप आमदार लांडगेंचे पुण्यात मशिदीविरोधात आंदोलन''

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसची महेश लांडगे यांच्यावर टीका
Sunil Gavane, Mahesh Landge News
Sunil Gavane, Mahesh Landge NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या जागेवरील बेकायदा मशीद हटवण्यासाठी भाजपसह सकल हिंदू समाज आणि विविध संघटनांच्या वतीने पुणे महापालिका भवनासमोर नुकतेच (ता.४) आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ''आम्ही अयोध्येतील बाबरी मशीद पाडू शकतो, तर पुण्येश्वरची अनधिकृत मशीद पाडूच शकतो, असा इशारा पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिला होता. त्यावर जालन्यातील मराठा समाजावरील लाठीमार आणि त्यांच्या आरक्षण आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी पुण्यात भाजप व त्यांचे आमदार लांडगेंनी आंदोलन केल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला.

विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या पिंपरी-चिंचवड कार्यकारी समितीचे सदस्य सुनील गव्हाणे यांनी भाजप आमदार नीतेश राणे आणि लांडगे या दोघांचाही बुधवारी समाचार घेतला. जालन्यातील लाठीमारानंतर राज्यभरातून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राज्यात मराठा सामजाचा आक्रमक पवित्रा, रोष आणि राजीनाम्याची मागणी यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आपल्या नेत्याच्या सांगण्यावरून महेशदादांनी पुण्यात मशिदीविरोधात आंदोलनाची तत्परता दाखवल्याचा हल्लाबोल गव्हाणेंनी केला.

Sunil Gavane, Mahesh Landge News
Pankaja Munde Shivshakti Rally : पंकजा मुंडे यांचे शंभू महादेवाच्या चरणी साकडे; म्हणाल्या, मुंडे साहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला शक्ती दे....

पण, आपल्या नेत्याला खूष करण्याच्या नादात आपण आपल्याच मराठा बांधवांच्या आंदोलनाला नख लावत आहोत, हे महेशदादांच्या लक्षात येवू नये, ही मराठ्यांची शोकांतिका आहे, असे ते खेदाने म्हणाले. एखादं पद मिळेल या आशेने पुरोगामी विचारांची होळी करून हिंदुत्ववादाकडे महेशदादा सरकले. ते त्यांना मिळाले, तर शुभेच्छाच. पण त्या नादात आपल्या गरीब मराठा बांधवांना हलाखीच्या गुलामगिरीतून बाहेर काढणाऱ्या आंदोलनाच्या मार्गावर दादा तूम्ही असे आडवे येवून आंदोलन विचलित करण्याचा प्रयत्न करायला नको होता, अशी खंतही गव्हाणेंनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, भाजपच्या (BJP) आंदोलनात त्यांचे घाटाखालील आमदार नितेश राणे यांनी पुणे (Pune) पालिका आयुक्त आणि शहर अभियंत्याचा एकेरी उललेख करीत शिवराळ आणि दमबाजीची भाषा वापरली होती. तिचा पुणे पालिका कर्मचाऱ्यांनी पुणेरी पद्धतीने काल समाचार घेतला. त्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तसेच पालिका आवारात राणे, लांडगेंसह त्यांच्या आंदोलनाचाही तीव्र निषेध नोंदवला.

Sunil Gavane, Mahesh Landge News
Pune Politics : माजी आमदार सोनवणेंना धक्का : खंदे समर्थक वाळुंज यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुण्याच्या परवाच्या आंदोलनात काही वर्षांपूर्वी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांची जात काढणारे नीतेश राणे देखील होते, याचा खास उल्लेख गव्हाणेंनी केला. सत्तेतले आमदार असूनही प्रशासनाला ताकीद द्यायची सोडून घोडे लावायची धमकी महेशदादांनी दिली. तेवढ्याच तत्परतेने त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा बांधवांवर केलेल्या अमानुष हल्ल्यावर रस्त्यावर उतरून निषेध करण्याचे सोडा, साधी सोशल मीडियावर निषेधाची किंवा दिलगिरीची पोस्ट केली नाही, की दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जेव्हा गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढले, तर मुंबईत पैसा राहणार नाही', समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल ?, शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत' अशी वक्तव्ये केली, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान केले तेव्हा सुद्धा महेशदादांची तत्परता पहायची होती, असे गव्हाणे म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com