Pune News, 22 Mar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रकाशित करत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर टीका केली होती.
त्यांनी केलेल्या टीकेनंतर विकास लवांडे यांना सातत्याने भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन येत असल्याची तक्रार लवांडे यांनी केली आहे. दरम्यान आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी आपल्या युट्युब व्हिडिओमध्ये संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरूजी आणि त्यांच्या धारकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्या प्रकारे इस्लामच्या नावाने काही सामान्य मुस्लिम तरुणांमध्ये काही आतंकवादी संघटना किंवा तालिबानी विचार रुजवले जातात, त्याचप्रकारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून हिंदू आतंकवादी बनवण्याचा भिडेंचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले होते.
त्यांच्या या वक्तव्यानंतर भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने लवांडेंना धमकीचे फोन येत असल्याचा दावा लवांडे यांनी केला आहे. या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना संभाजी भिडे गुरुजींचे धारकरी म्हणवणाऱ्यांकडून शेकडोच्या संख्येने फोनवरून व सोशल माध्यमातून जाहीरपणे जीवे मारण्याच्या व घातपात करू अशा धमक्या आलेल्या आहेत.
याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पुणे शहर पोलिसांना सविस्तर पुराव्यासह तक्रार देऊनही अद्याप कुणावरही काहीही कारवाई झालेली नाही. 1 मार्च 2025 रोजी सायंकाळी विकास लवांडे यांच्या हवेली तालुक्यातील शिंदेवाडी गावात 250 ते 300 बाहेरील तरुणांचा बेकायदा जमाव त्यांच्या घरावर दहशत माजवण्याच्या हेतूने गेला होता.
त्यावेळी स्थानिक पोलिसांना कळवले व गावात पोलिस बंदोबस्त मिळाला म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र, तक्रार देऊनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. त्यानंतरही धमक्या सुरूच आहेत. कालही अज्ञात व्यक्तीने "जय श्रीराम " म्हणत उद्या तुझ्या घरी येतो आणि दाखवतो अशी धमकी विकास लवांडे यांना दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पुण्याचे पोलिस आयुक्त यांनी कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सामाजिक कार्यकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणून अशा पद्धतीने झुंडशाहीने दहशत माजवू पाहणाऱ्या व बेकायदा कृत्य करणाऱ्या लोकांचा तात्काळ बंदोबस्त होणे आवश्यक आहे, असं सुप्रिया सुळे म्हणल्या.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.