अन् 'लाजवा'ची मैफल अनेक वर्षांनी पुन्हा रंगली

Laxman Jagtap : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली
Laxman Jagtap
Laxman Jagtapsarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जीवघेण्या आजारातून नुकतेच उठलेले चिंचवडचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे काल प्रथमच घराबाहेर पडले ते स्वातंत्र्यदिनाच्या शाळेतील झेंडावंदनासाठी. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शहरातील ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) 'लाजवा'ची (लांडे-जगताप-वाघेरे) मैफल खूप वर्षांनी पुन्हा रंगली.

पन्नास दिवस 'आयसीयू'तील उपचारानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात आमदार जगताप म्हणजे कार्यकर्त्यांचे भाऊ हे घरी आले. त्यानंतर १० जून व २० जून रोजी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी ते कार्डियाक अॅम्बूलन्सने मुंबईला गेले होते. नंतर ते घरीच आराम करीत होते. काल ते प्रथमच बाहेर पडले. पिंपळे गुरव येथून निवासस्थानाहून ते नवी सांगवीतील न्यू मिलेनियम शाळेत गेले. तेथे त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन केले. दरम्यान, नुकताच त्यांचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी काल झेंडावंदनही केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत आणखी उत्साह संचारला आहे.

Laxman Jagtap
`वंदे मातरम`चा इतका द्वेष का? मुनगंटीवारांच्या मदतीला फडणवीस धावले...

जगतापांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे-पाटील, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, पालिकेतील पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा सभापती नवनाथ जगताप यांनी जगतापांची पिंपळे गुरव येथील घरी जाऊन भेट घेतली.

त्यांची आस्थेने विचारपूस केली. याव्दारे पूर्वी एकाच पक्षात म्हणजे राष्ट्रवादीतील या 'लाजवा ग्रुप'चा (लांडे, जगताप, वाघेरे) फड पुन्हा जमला. ते जुन्या आठवणीत पुन्हा एकदा रमले. लांडे आणि जगताप हे जवळचे, तर वाघेरे-आणि जगताप हे दूरचे नातेवाईक आहेत. तिन्ही पाटील घराणी असून शहराच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. २००२ ला 'लाजवा ग्रुप' मधील तिघेही (विलास लांडे, लक्ष्मण जगताप आणि संजोग वाघेरे-पाटील) नगरसेवक होते. तेव्हा त्यांचा हा ग्रुप जमला होता. त्या नावाने तो ओळखला जात होता. बारा वर्षे तो कायम होता. २०१४ ला जगताप हे भाजपमध्ये गेले आणि लाजवा गट फुटला. त्यानंतर आता हे तिघे पुन्हा एकत्र आले. मात्र, त्यांचे पक्ष वेगळे झालेले आहेत.

Laxman Jagtap
बांगर-सुर्वेंची दमबाजी आणि शिंदे-फडणवीस म्हणतात आमचीच मुस्कटदाबी...

आपण दोघे काय (वल्ली) आहोत, हे फक्त आपल्यालाच माहित आहे, असे आमदार जगताप हे माजी आमदार लांडे यांना यावेळी म्हणताच त्याला इतरांनी सूचक दाद दिली. त्यातून जगतापांच्या स्मरणशक्ती व उपरोधिक स्वभावाचा पुन्हा प्रत्यय आला. तिथे (राष्ट्रवादी) राहून काय उपयोग, आता तिथे कोण आणि किती प्रामाणिक राहिलेत, असा टोला जगताप यांनी लांडेंना लगावला. त्यातून लांडेंना राष्ट्रवादीने साइडलाइन केल्याची खंत त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. जवळजवळ तासभर या गप्पा रंगल्या. जगतापांचे बंधू विजय जगताप हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com