Supriya Sule : हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीतील नेते नाराज; सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या...

Harshvardhan Patil Join NCP SP : भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील इंदापुरातून विधानसभा लढवणार असल्याचं निश्चित आहे. मात्र, त्यांच्या या उमेदवारीला राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे.
Supriya Sule, Harshvardhan Patil
Supriya Sule, Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 04 Oct : मागील काही दिवसांपासून भाजपचे (BJP) नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अखेर पाटील यांनी पूर्णविराम देत आपण भाजपला रामराम ठोकत असल्याचं जाहीर केलं आहे.

भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Sharad Pawar NCP) गेलेले हर्षवर्धन पाटील इंदापुरातून विधानसभा लढवणार असल्याचं निश्चित आहे. मात्र, त्यांच्या या उमेदवारीला राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे.

कारण याबाबत खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज असल्याचं म्हटलं आहे. पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या घोषणेनंतर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले, "हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील तर ते साहजिक आहे. कारण प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी.

Supriya Sule, Harshvardhan Patil
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांसह आमदार आणि खासदारांनी मंत्रालयातील जाळीवर घेतल्या उड्या, कारण काय?

पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मात्र, त्यांना उमेदवारी दिल्यामुळं जे नाराज आहेत, त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करु." तसंच पाटील आणि पवार कुटुंबाचे सहा दशकांचे संबंध आहेत. ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत, याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते मात्र आमचे संबंध कायम होते, असं सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

Supriya Sule, Harshvardhan Patil
Sanjay Shirsat : नरहरी झिरवळांची मंत्रालयाच्या जाळीवर उडी, मुख्यमंत्र्यांचा शिलेदार म्हणाले, 'फक्त बातमी होईल...'

तुतारी हाती घ्या; कार्यकर्त्यांचा आग्रह

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचं सांगितलं. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. शिवाय मी हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com