NCP News : वाढती महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे घेवून राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्यस्तरीय 'जनजागर यात्रा' सुरू होणार आहे. महिला शिक्षणाचे क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या भिडे वाड्यातील स्मारकाला उद्या अभिवादन करून बुधवार (ता.४) ला ही यात्रा मुंबईकडे रवाना होणार आहे.
राज्यात महिला धोरणाचा निर्णय घेणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा सन्मान सोहळा पुण्यात होणार आहे. या महिला आघाडीने पवार यांच्यावर भारदस्त पोवाडा देखील रचला आहे. या कार्यक्रमानंतर शरद पवार या जनजागर यात्रेला झेंडा दाखवून यात्रा रवाना होईल, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आमदार विद्याताई चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात ही यात्रा पुण्यातील भिडे वाडा ते मुंबईतील चैत्यभूमी अशी राहणार आहे. तर २६ जानेवारीला दुसऱ्या टप्प्यात जनजागर यात्रा विदर्भातून सुरू होणार आहे. त्यानंर उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातून यात्रा जाईल, असेही विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.