Ashok Pawar News : शिरुरमध्ये राजकारण तापलं; घोडगंगा साखर कारखान्याच्या सभेत राडा, 'अशोक पवार चोर है'च्या घोषणा

Ghodganga Sugar Factory Sabha : शिरुर येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ही शुक्रवारी (ता.20) आयोजित करण्यात आली होती.या सभेतच आमदार अशोक बापू पवार यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.
Ashok Pawar
Ashok PawarSarkarnama
Published on
Updated on

Shirur News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सुरुवातीला तळ्यात-मळ्यात भूमिका राहिलेले शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी अखेर शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरुरमध्ये जाऊन अशोक पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. अशातच आता घोडगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा झाला आहे.

शिरुर येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ही शुक्रवारी (ता.20) आयोजित करण्यात आली होती.या सभेतच आमदार अशोक बापू पवार(Ashok Pawar) यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. यात अशोक पवार चोर है अशाही घोषणा देण्यात आल्या.

वार्षिक सभा सुरू असतानाच उपस्थित शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आंबेगाव जुन्नरमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी जुन्नरमधील येथील सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी घोडगंगा साखर कारखाना बंद पडल्यावरून शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.

यावेळी अजितदादांनी तुमचा व्यंकटेश कृपा हा खासगी साखर कारखाना बंद पडत नाही आणि घोडगंगा कारखानाच कसा बंद पडतो, असा सवालही आमदार पवारांना केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गाळप झालेल्या उसाला चांगला बाजारभाव देण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. तुमच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानेही चांगला भाव दिला आहे. बाकीच्या कारखानदारांनी काय भाव दिला आहे, असा सवाल करत अजित पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा तर भावच नाही, कारण तो कारखाना बंदच आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवारांना डिवचलं होतं

Ashok Pawar
Eknath Shinde : CM शिंदेंकडून 'नो एन्ट्री', भोंडेकर गेटवरुनच 'रिटर्न'; नाराज आमदार म्हणतात, 'माझा प्लॅन बी तयार...'

राष्ट्रवादी फुटल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पाच आमदारांपैकी खेडचे दिलीप मोहिते-पाटील आणि जु्न्नरचे दिलीप वळसे-पाटील यांनी अजितदादांना साथ दिली. परिणामी वळसे पुन्हा युतीच्या सरकारात मंत्री झाले, तर शिरूरचे अशोक पवार, हडपसरचे चेतन तुपे आणि जुन्नरचे अतुल बेनके यांचे तळ्यात-मळ्यात होते. त्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती.

नंतर चेतन तुपे आणि अतुल बेनके अजितदादांसोबत गेले. त्यामुळे अशोक पवार हेही त्यांची सोबत जातील, अशी चर्चा होती. पण, त्यांनी शरद पवारांची साथ दिली. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंचा विजय सुकर झाला होता. शिरुरमधील पाचपैकी चार आमदार आपल्याकडे खेचून आणण्यात यश आलेल्या अजितदादांच्या टार्गेटवर शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार हे कायमच राहिल्याचे दिसून आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com