Nagpur News : विधानसभा निवडणुका जवळ येताच इच्छुकांसह आजी-माजी आमदारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आपल्याच तिकीट मिळावे या उद्देशाने प्रत्येकजण फिल्डिंग लावतो आहे. शिवसेना शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Modi) हेही पुन्हा एकदा भंडारा मतदारसंघातून मैदानात उतरण्यासाठी तयार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवरच ते गुरुवारी (ता.19) मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधील रामगिरी या निवासस्थानी दाखल झाले होते. पण त्यांना प्रवेश न मिळाल्याने परत जावं लागलं. यावरुन ते कमालीचे नाराज झाल्याची चर्चा आहे. अशातच त्यांनी मुख्यमंत्र्यांसह महायुतीलाच सूचक इशारा दिला आहे. त्यांनी आपल्याला जुना अनुभव फार डेंजर असून 'बॅकअप प्लॅन' तयार ठेवला असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे विदर्भात येऊन तेथील स्थानिक आमदारांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ न देणे ही गोष्ट भोंडेकरांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.ते शिंदे यांच्या अत्यंत जवळचेही समजले जातात. शिवसेनेतील बंडावेळीही भोंडेकर यांनी गुवाहाटीला गेले होते. पण थेट भोंडेकरांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नो एन्ट्री दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.यावर आता आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भोंडेकर म्हणाले, मला महायुतीकडून लढण्याची इच्छा आहे.मी आधीपासून शिवसेनेत राहिलोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत राहिलो आहे.मात्र, माझ्या जागेवर भाजपा, राष्ट्रवादीनेही दावा ठोकला आहे. त्यामुळे आपणही आपला बॅकअप प्लॅन तयार ठेवला असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. भोंडेकर नेमकं काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
भोंडेकर म्हणाले,आम्हाला जुना अनुभव फार डेंजर आहे. तिकीट देतो,तिकीट देतो म्हणत होते, 2019 ला उद्धव ठाकरे फोनच उचलत नव्हते. शिवसेना नेहमी मुंबई, ठाणे याला प्राधान्य देते. त्यामुळे आम्हीही पर्याय ठेवलेत. आमची मानसिकता शिवसेना-भाजपातून लढण्याची आहे. परंतु परिस्थिती जर आली तर काय करायचं, घरी तर बसणार नाही. त्यामुळे बॅकअप प्लॅन असायलाच हवा हे आमदार भोंडेकरांचं विधान महायुतीचं टेन्शन वाढवणारं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जे काही अपक्ष आमदार आहेत,त्यात आपण सर्वात पहिलं त्यांच्यासोबत गेल्याचा दावाही आमदार भोंडेकर यांनी केला.ते म्हणाले,महायुती सरकारच्या काळात तरी भंडारा जिल्ह्याला न्याय मिळेल अशी अशी आशा होती. पण न्याय मिळाला नाही. अजून निवडणुकीला वेळ बाकी आहे,जी काही आश्वासने देण्यात आली होती ते मुख्यमंत्री पूर्ण करतीलच.
मंत्रिपद मग ते महायुतीत कुणालाही मिळाले असते तरीदेखील आमच्या भंडारा जिल्ह्याला न्याय मिळाला असता.आता मात्र आमच्या मनात मंत्रिपद न मिळाल्याची खंत राहणारच आहे असल्याचंही भोंडेकरांनी सांगितलं.
आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले,सध्यातरी आपण युतीतून लढायचं ठरवलं आहे. मी शिवसेना-भाजप विचारांचा आहे.परंतु पुढे परिस्थिती काय आहे, माझ्या मतदारसंघावर भाजप,राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडून दावा केला जात आहे. त्या परिस्थितीत वरिष्ठांना त्यांना समजवण्यात यश आले तर काही नाहीच.
मात्र,धनुष्यबाणावर लढण्याची आपली इच्छा आहे.मात्र जागांवर दावा पाहता कुणाला जागा मिळते त्यावर पुढचा निर्णय जो काही आहे तो ठरवू असं अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपुरात त्यांच्या शासकीय निवासस्थानी, रामगिरी निवासस्थानी मुक्कामी होते. यावेळी शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. पण गेटवर ड्युटी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही.
बाहेरून कोणालाही आत सोडू नये असे निर्देश आतून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यामुले कोणालाही आत सोडता येत नाही असे कारण यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी भोंडेकर यांना दिले. त्यानंतर नरेंद्र भोंडेकर पुन्हा भंडाऱ्याला परत निघून गेले. मात्र, परत जाताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी "आपल्याला एन्ट्री न दिल्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेट बंद केल्यामुळे परत जात आहोत" अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.