MLA Rohit Pawar: रोहित पवारांचे पिंपरी-चिंचवडमध्ये 'सोशल इंजिनिअरिंग'; भाजपविरोधी ताकद एकजूट करण्याचा प्रयत्न

Pimpri-Chinchwad : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घातले आहे
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घातले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात यंग ब्रिगेड उतरवली आहे. आमदार रोहित पवार हे मंगळवारी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असून, ते राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत 'सोशल इंजिनिअरिंग' करणार आहेत. भाजपविरोधातील नेते आणि शहर परिसरातील ताकद एक करण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने (शरद पवार गट) पिंपरी-चिंचवड शहरातील आजी-माजी नगरसेवक विविध सामाजिक संस्था संघटना यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराध्यक्ष म्हणून तुषार कामठे यांची निवड झाल्यानंतर साहेब गट ॲक्टिव्ह झाला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता आमदार रोहित पवार हे शहर परिसरातील भाजपविरोधी नेत्यांची तसेच शरद पवार यांना मानणाऱ्या नेत्यांशी संवाद साधत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Rohit Pawar
PCMC News : अजितदादांचा धसका; तक्रार येताच आयुक्तांनी छाटले करसंकलन विभागप्रमुखाचे पंख

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि युवक अध्यक्ष इमरान शेख यांच्या वतीने तरुणाईची एकजूट केली जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सकाळी नऊ वाजता रोहित पवार यांचे आगमन झाले. या वेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर आदी उपस्थित होते.

भाजपविरोधी ताकद एकजूट करण्याचा प्रयत्न

चिंचवड येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर अण्णा चिंचवडे आणि भोईर कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर संत तुकारामनगर येथील जैन संघटनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली, तसेच माजी नगरसेवक बबन गाढवे, डावी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भक्त यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. शहरातील भाजपविरोधी ताकद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Edited by : Ganesh Thombare

MLA Rohit Pawar
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड काँग्रेसमधील गटबाजी उफाळली; शहराध्यक्ष कदमांच्या राजीनाम्याची मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com