Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची बिनविरोध निवड

Rohit Pawar : या निवडीनंतर रोहित पवारांनी ट्विटरवरून सर्व सदस्यांचे आभार मानले
 Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडली. यावेळी आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला. त्यानंतर असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार (Rohit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली. तर किरण सामंत यांची असोशिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीनंतर रोहित पवार यांनी ट्विटरवरून सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

 Rohit Pawar
Teachers Constituency : नवख्या किरण पाटलांचा अनुभवी विक्रम काळेंशी सामना ...

या निवडीनंतर रोहित पवार म्हणाले..

'एमसीए'च्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल एमसीएच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, अजितदादा आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा पाठिंबा, तसंच एमसीएचे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली.

 Rohit Pawar
Sharad Pawar : "पतंगरावांनी भारती विद्यापीठ वाढवली, पण त्यांची खरी निष्ठा मात्र..." पवारांनी जागवल्या आठवणी!

उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज व सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभलं. क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता एमसीएच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. पुनश्च सर्वांचे आभार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com