Rohit Pawar on BRS: 'बीआरएस'मध्ये प्रवेशासाठी का होतेय गर्दी; रोहित पवारांनी सांगितलं कारण...

BRS : 'बीआरएस' या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे.
Rohit Pawar and KCR
Rohit Pawar and KCRSarkarnama

Political News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात 'बीआरएस' या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. यासाठी 'बीआरएस'ने राज्यात मोठी मोर्चे बांधणी करण्यास सुरवात केली असून मराठवाड्यासह सोलापुरातील शेकडो कार्यकर्त्यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला.

त्यानंतर आज अहमदनगरच्या श्रीगोद्यातील राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार यांनीही बीआरएसमध्ये जाहिर प्रवेश केला. 'बीआरएस'ने आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, आता 'बीआरएस'वर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला असून महाराष्ट्रात 'बीआरएस'चे कल्चर टीकणार नाही, असा टोला लगावला. एका वृत्तवाहीनीशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेशासाठी होत असलेल्या गर्दीचे कारणही सांगितले आहे.

Rohit Pawar and KCR
Pimpri-Chinchwad: पिंपरी पालिकेचा दणका; थकबाकीदारांच्या शंभर जप्त मालमत्तांचा करणार लिलाव !

यावेळी त्यांनी 'बीआरएस' पक्षावर मोठे आरोपही केले. रोहित पवार म्हणाले, "'बीआरएस'मध्ये सध्या महाराष्ट्रातील अनेक लोकं प्रवेश करत आहेत. पण बाहेरचे लोकं महाराष्ट्रात आले तर त्यांना महाराष्ट्राचे विचार कळणार नाहीत. 'बीआरएस'मध्ये प्रवेश केलेल्या एका पदाधिकाऱ्याला एका महिन्याला तब्बल तीन लाख रुपये पॅकेज असून महाराष्ट्रात हे कल्चर फार काळ टीकणार नाही", असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar and KCR
Ahmednagar Politics: नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार; घनशाम शेलारांचा 'बीआरएस'मध्ये प्रवेश

दरम्यान, 'बीआरएस'ने आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठा प्लॅन तयार केला असून त्या दृष्टीने 'बीआरएस' पक्ष महाराष्ट्रात पक्ष संघटन मतबूत करत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत 'बीआरएस'चा फटका राज्यातील काही राजकीय पक्षाला बसू शकतो, असं काही राजकीय जाणकार सांगतात. पण असं असंल तरी रोहित पवारांनी 'बीआरएस'वर केलेल्या आरोपाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com