संजय आ. काटे :
Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोद्यातील मोठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी बीआरएस पक्षात जाहिर प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांनी हैदराबादमध्ये 'बीआरएस'चे प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्या उपस्थितीत 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला आहे. 'बीआरएस'मध्ये प्रवेश केल्याची माहिती खुद्द घनशाम शेलार यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घनशाम शेलार नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नगर जिल्ह्यात मोठं खिंडार पडलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी का सोडली? याचे कारण खुद्द घनशाम शेलार हे उद्या (गुरवारी) पत्रकार परिषद घेऊन ते याबाबतची माहिती देणार आहेत, याची माहिती खुद्द घनशाम शेलार यांनीच दिली आहे. 2019 ला घनशाम शेलार यांनी श्रींगोदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. आज अखेर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.