Ajit Pawar: अजित पवारांचा आमदार 'बर्थ डे' सेलिब्रेशनमध्ये बिझी; भाजपनं मतदारसंघातच लावला 'करेक्ट कार्यक्रम'

NCP Politics : माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता त्यांच्याच नेतृत्वाखाली मुळशीतील राष्ट्रवादीच्या 4 दिग्गज नेत्यांसह 15 गावांचे सरपंच, उपसरपंच आणि 50 हून अधिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत (भाजप) प्रवेश केला आहे.
Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून मिशन बारामती भाजपने चांगलंच मनावर घेतलं असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला मतदारसंघातील मोठमोठे नेते आपल्याकडे घेतल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांना देखील पक्षप्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघातून बुधवारी(ता.13) भाजपमध्ये (BJP) मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले. या प्रवेशामध्ये मुळशीमधून लक्षणीय प्रवेश झाले. या प्रवेशाच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा वाढदिवस आहे.आमदार एकीकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमात व्यस्त असताना दुसरीकडे मांडेकर यांच्या प्रभाव क्षेत्राखाली असलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात स्थानिक नेत्यांनी मुंबई येथील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.

हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मुळशी तालुक्यात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता त्यांच्याच नेतृत्वाखाली मुळशीतील राष्ट्रवादीच्या 4 दिग्गज नेत्यांसह 15 गावांचे सरपंच, उपसरपंच आणि 50 हून अधिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत (भाजप) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे मुळशीतील भाजपची ताकद आणखी वाढली असल्याचं बोललं जात आहे.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सभापती, पीएमआरडीएचे सदस्य, विविध संस्थांचे संचालक आणि विद्यमान सरपंचांचा समावेश आहे. काँग्रेसमधून माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुळशीतील राजकीय समीकरणे आधीच बदलली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महत्त्वाच्या नेत्यांन सह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Modi Government: मोदी सरकारला पहिला धक्का? 'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात...'; माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

या सर्व घडामोडींमुळे मिशन बारामती भाजपने किती मनावर घेतलंय याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. प्रवेशामुळे मिशन बारामतीचा भाजपच्या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासूनच सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रवेश करणारी प्रमुख नेतेमंडळी

माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सुखदेव तापकीर, सुरेश हुलावळे, अमित कंधारे, पांडुरंग राक्षे, मोरेश्वर घारे यांचा समावेश आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संग्राम थोपटे, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सहसचिव भरत राऊत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com