Modi Government: मोदी सरकारला पहिला धक्का? 'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात...'; माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

Jagan Mohan Reddy News : एकीकडे राहुल गांधींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुन्हा एकदा मोट बांधत 'वोटचोरी' कॅम्पेनद्वारे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपची झोप उडवली आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारबाबत मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.
Narendra Modi, Chandrababu Naidu rahul gandhi .jpg
Narendra Modi, Chandrababu Naidu rahul gandhi .jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्याने नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने एनडीए सरकार स्थापन झाले.

  2. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी दावा केला की चंद्राबाबू नायडू हे राहुल गांधींच्या संपर्कात आहेत, ज्यामुळे राजकीय भूकंपाची शक्यता आहे.

  3. राहुल गांधींनी ‘वोटचोरी’ मोहिमेद्वारे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असून मोदी सरकारवर विरोधकांचा दबाव वाढला आहे.

New Delhi News : मागील वर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार चा नारा दिलेल्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालं नाही. अखेर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूसह एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेत भाजपला सत्तास्थापन करावी लागली. या सरकारच्या कार्यकाळाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. याचदरम्यान,आता केंद्रातील एनडीए सरकारमधील चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

एकीकडे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुन्हा एकदा मोट बांधत 'वोटचोरी' कॅम्पेनद्वारे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपची झोप उडवली आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारबाबत मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याचा सनसनाटी दावा वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी केला आहे.या त्यांच्या दाव्यामुळे दिल्लीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Narendra Modi, Chandrababu Naidu rahul gandhi .jpg
Eknath Shinde News: 'एकनाथ शिंदेंमुळेच राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता...'; सरकारमधील मंत्र्यांचं खळबळजनक विधान

वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी रेड्डी यांच्या दाव्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या गोटात काही प्रमाणात अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमधील मतदानातील तफावतीविषयी चर्चा न केल्याबद्दल घणाघाती टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांच्याविषयी का बोलत नाही? कारण ते तर आमदारकीची निवडणूक हरले असल्याचं त्यांनी म्हटलं.

Narendra Modi, Chandrababu Naidu rahul gandhi .jpg
NDA Vs Congress : 'एनडीए'ची सत्ता गेली, काँग्रेसचे निवडून आलेले सर्व 23 आमदार बनले मंत्री; महिला नेत्यानं उलटवला होता डाव

याचवेळी जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आंध्र प्रदेशबद्दल चकार शब्द काढत नसल्याचा गंभीर आरोपही केला. तसेच राहुल गांधींविषयी आपण काय बोलावे, जे स्वतः प्रामाणिक नाहीत असा हल्लाबोल त्यांनी केला..यामागे चंद्राबाबू तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत हॉटलाइनद्वारे त्यांच्याशी संपर्कात असल्याचा दावाही रेड्डी यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला बिहार आणि आंध्र प्रदेशातील दोन बाबूंनी वाचवले. एनडीएला लोकसभा निवडणुकीत एकूण 292 जागा मिळाल्या असून 272 पेक्षा 20 जागा जास्त आहेत. सर्वाधिक 240 खासदार भाजपकडे आहेत. तर चंद्राबाबूंच्या 16 आणि नितीश कुमारांच्या 12 जागा अशा एकूण 28 जागा आहेत.

Narendra Modi, Chandrababu Naidu rahul gandhi .jpg
Rohit Pawar News : अजित पवारांनी जर 'तो' निर्णय घेतला, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार...! रोहित पवारांचं मोठं विधान

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतांचा मोठा घोटाळा केल्याचा आरोपानं खळबळ उडवली आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे केंद्रात आणि बिहारमध्ये भाजपसोबत आहेत. नितीश कुमार हे एनडीए सरकारमधून कधीही बाहेर पडू शकतात, असा दावा विरोधकांकडून सातत्याने केला जात असतो.

प्र.१: लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले का?
उ: नाही, एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाले.

प्र.२: चंद्राबाबू नायडू आणि राहुल गांधींच्या संपर्काबाबत दावा कोणी केला?
उ: वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी.

प्र.३: राहुल गांधींनी मोदी सरकारवर कोणता आरोप केला?
उ: निवडणूक आयोगासोबत संगनमत करून मतांचा घोटाळा केल्याचा.

प्र.४: नितीश कुमारांविषयी विरोधक काय म्हणतात?
उ: ते कधीही एनडीए सरकारमधून बाहेर पडू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com