Maval Crime News : बदनामी करून राजकारणातून उठविण्याचा विरोधकांचा डाव; शेळकेंचा रोख कुणाकडे?

Maval News : पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचेही शेळके यांनी सांगितले.
Sunil Shelke News
Sunil Shelke NewsSarkarnama

Ncp Mla Sunil Shelke News : तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची काल भरदिवसा निर्घूण हत्या झाली. त्याबाबत स्थानिक आमदार सुनील शेळकें व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मात्र, आमदार शेळके यांनी बदनामीसाठी आपल्याला या गुन्ह्यात गोवले असल्याचे आज दुपारी पत्रकारपरिषद घेऊन सांगितले. नॉट रिचेबल असल्याच्या आणि फोन बंद असल्याच्या बातम्या आल्याने ही प्रेस पत्रकार परिषद घेत असल्याचे ते म्हणाले. त्यात घरी बसेन पण जीवावर बेतणारे असे राजकारण करणार नाही, असे ते म्हणाले.

Sunil Shelke News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

त्याचवेळी माझी बदनामी करून राजकारणातून मला अलिप्त करण्याचा प्रयत्नही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आपल्या या बदनामीमागे कोण आहेत, त्यांना पुढे आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांना (Police) सहकार्य करण्यास तयार आहे. त्यांनी माझी खुशाल चौकशी करावी, पण माझी बदनामी करणाऱ्यांचीही ती करण्याची मागणी त्यांनी केली. गुन्ह्यातील सत्य पोलिस पुढे आणतील, असेही ते म्हणाले.

किशोर आवारे यांच्या खूनाचा तीव्र निषेध आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी सुरवातीसच केला. तसेच त्यांच्या खून्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली. या घटनेने मावळातील राजकारणात वाईट पायंडा पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्या अख्या आयुष्यात आपण साधी चापटी सुद्धा कुणाला मारली नसल्याकडे त्यांनी सांगितले. यात राजकारण आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Sunil Shelke News
Karnataka Election Result : निपाणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव पाटील आघाडीवर

१५ वर्षाच्या कामाची फक्त १५ मिनिटात बदनामी होत असल्याने माध्यमांनी खात्री करून बातम्या द्यावात, असे ते कळकळीने म्हणाले. तपासात अडथळा न आणण्याचे तसेच शक्तीप्रदर्शन न करण्यासही त्यांनी आपल्या समर्थकांना यावेळी बजावले. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आजच व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचीही यासंदर्भात भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com