Supriya Sule News: भाजपचा स्वबळाचा नारा; राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग, हालचाली वाढल्या; सुळेंचा अजितदादांच्या 'या' विश्वासू नेत्याला फोन

NCP Politics: एकीकडे शरद पवारांच्या पक्षातील एक गट पुण्यामध्ये अजित पवारांसोबत जाण्यासाठी अनुकूल नसल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये असल्याच सांगितलं जात आहे.
Supriya Sule, Ajit Pawar
Supriya Sule, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.15) पुणे आणि पिंपरी चिंचवडसह बहुतांश ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये स्थान नसेल असं स्पष्ट केला आहे.

त्यानंतर अजित पवार यांनी देखील आपले पत्ते बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करताच पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादीत मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांसह अजित पवारांनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्यातील काही वरिष्ठ नेत्यांना फोन करून भेटायला बोलावल्याचं देखील सांगितलं जात आहे. मात्र, पुण्यातील शरद पवार यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांची भेट घेणं काल टाळलं होतं.

एकीकडे शरद पवारांच्या पक्षातील एक गट पुण्यामध्ये अजित पवारांसोबत जाण्यासाठी अनुकूल नसल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये असल्याच सांगितलं जात आहे.

सर्वप्रथम नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन निवडणुका लढल्यानंतर पिंपरी चिंचवडमधूनच महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची सुरुवात देखील पिंपरी चिंचवड मधूनच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Supriya Sule, Ajit Pawar
Uddhav Thackeray: गळती थांबता थांबेना, त्यात शिवसैनिकांना मिळवून दिली काँग्रेसची उमेदवारी; संतापलेल्या ठाकरेंनी विभागप्रमुखाला अद्दलच घडवली

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या पक्षाची एकत्रित बैठक पहिल्यांदाच पार पडली आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे.

या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर नाना काटे यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. नाना काटे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे त्यांना फोन केला होता आणि त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता.

Supriya Sule, Ajit Pawar
Balraje Pawar Arrest Update : अटकेनंतर बाळराजे पवारांची कोठडीत रवानगी: गेवराई राड्यातील एक एकेकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची धडपड

त्यामुळे एकीकडे अजित पवार हे पुण्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना फोन करून बैठकीचा निमंत्रण देत असताना दुसरीकडे पिंपरी चिंचवड मध्ये खासदार सुप्रिया सुळे यादेखील आघाडीसाठी अजितदादांच्या पक्षातील नेत्यांची संपर्क करत असल्याचं बोललं जात आहे. यावरून ‘पवार कुटुंबा’तील वरिष्ठ स्तरावरूनच ही आघाडीची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या आदेशानुसारच पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या बैठकीत भाजपविरोधी लढण्यासाठी ‘घड्याळ’ की ‘तुतारी’ यापैकी कोणते चिन्ह वापरायचे, तसेच आघाडी करून दोन्ही पक्षांनी आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवायची याबाबत प्राथमिक चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com