Pankaja Munde, Pritam Munde, Dhananjay Munde
Pankaja Munde, Pritam Munde, Dhananjay MundeSarkarnama

Beed lok Sabha Constituency : बीड लोकसभेचा उमेदवार ठरला ? महायुतीच्या मेळाव्यात शिक्कामोर्तब

Beed lok Sabha Constituency : बीड लोकसभेचा उमेदवार कोण असणार ? 'या' नावावर स्थानिक नेत्यांकडून शिक्कामोर्तब
Published on

Beed News: लोकसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या अनुषंगाने महायुतीने जोरदार तयारी सुरु केली असून राज्यभरात महायुतीचे मेळावे पार पडत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे. रविवारी बीडमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला.

या मेळाव्यात बीड लोकसभेला महायुतीचा उमेदवार कोण ? यावर महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. बीडमध्ये डॉ.प्रीतम मुंडे याच लोकसभेला उमेदवार असतील आणि त्या हॅट्‌ट्रीक करतील, असा विश्वास या मेळाव्यात मित्रपक्षांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde, Pritam Munde, Dhananjay Munde
Pritam Munde : बीडमधून प्रीतम मुंडेंची 'धाव' सुसाट ! मॅरेथॉनमध्ये दिले संकेत

महायुतीत मित्रपक्षांची संख्या वाढत असतानाच आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांत समन्वय असावा, या हेतूने जिल्हा पातळ्यांवर महायुतीच्या मित्रपक्षांचे संमेलनं आयोजित करण्यात आली आहेत. बीडच्या संमेलनाच्या समन्वयाची जबाबदारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचे संमेलन रविवारी झाले. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ.प्रीतम मुंडे, समन्वयक अमरसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भिमराव धोंडे, आर.टी.देशमुख, भाजपचे रमेशराव आडसकर, शिवसेनेचे प्रा.सुरेश नवले, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.

या संमेलनात महायुतीच्या नेत्यांनी भाषणं केली. या भाषणामध्ये लोकसभेला महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर भाजपचे रमेशराव आडसकर हे बोलताना म्हणाले, 'महायुतीचाच आणि भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडेच उमेदवार असतील', असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर भाषणाला उठलेल्या अमरसिंह पंडितांनी देखील उमेदवार डॉ.प्रीतम मुंडेच असतील, यात आडसकरांना शंकाच का, असा प्रश्न मांडला.

तसेच इतर नेत्यांनीही डॉ.प्रीतम मुंडेच उमेदवार असतील, असे जाहीर करुन टाकले. त्यानंतर डॉ.प्रीतम मुंडे यांनीही आपली उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आभार मानले. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही डॉ.प्रीतम मुंडे उमेदवार असतील आणि देशात सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारीसाठी भाजप आग्रह करत असल्याच्या चर्चा आहेत. तसेच, राष्ट्रवादीकडूनही राजकीय ताकदीच्या जोदारवर महायुतीत बीडच्या लोकसभा जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर आता स्थानिक पातळीवर या शक्यतांवर पडदा पडला आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Pankaja Munde, Pritam Munde, Dhananjay Munde
Pankaja Munde: महायुतीच्या मेळाव्याला पंकजा मुंडेंनी का मारली दांडी ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com