Ajit Pawar VS Sharad Pawar: अजित पवारांच्या गडावर शरद पवारांची करडी नजर; पिंपरी-चिंचवडमध्ये घेणार जाहीर सभा

Pimpri-Chinchwad : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा होणार
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : अजित पवारांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लक्ष घातले असून, पुढील महिन्यात ते जाहीर सभा घेणार आहेत, तर त्याआधी रविवारी शहराध्यक्षाचीदेखील निवड करण्यात आली. या निवडीनंतर लगेच पंधरा दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मेळावादेखील होणार आहे. त्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांचीही जाहीर सभा होणार असल्यामुळे अजितदादांचा बालेकिल्ला आता शरद पवारांच्या निशाण्यावर असणार आहे.

एकूणच येत्या काही दिवसांत उद्योगनगरीत पवार विरुद्ध पवार असाच संघर्ष पाहायला मिळणार, याचे संकेत मिळाले आहेत. काऱण चुलत्याच्या (अजित पवार) या बालेकिल्ल्याची जबाबदारी आता पुतण्याने (रोहित पवार यांनी) घेतली आहे. त्यांनी आपली तरुण टीम बांधायला शहरात सुरुवात केली आहे. पक्ष प्रवेशही सुरू केले आहेत.

अजित पवार गटातून ही मंडळी येत आहेत आणि येणारही आहेत. त्यातून शहरात पवार विरुद्ध पवार अशीच लढाई आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्याची झलक रोहित पवारांच्या झंझावाती पिंपरी-चिंचवड दौऱ्यातून दिसली.

Sharad Pawar and Ajit Pawar
Ajit Pawar Vs Rohit Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची जोरदार एन्ट्री; पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यात अनेकांची घरवापसी

अध्यक्ष दिल्यानंतर आता कार्याध्यक्ष दहा दिवसांत शहराला देणार असल्याचे रोहित पवार यांनी पिंपरीत सांगितले. पंधरा दिवसांत पक्षाच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त प्रदेशाध्यक्ष मेळावा घेणार आहेत, तर पुढील महिन्यात शरद पवार यांची उद्योगनगरीत जाहीर सभा होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. अजितदादांच्या कामांमुळे त्यांचा आदरयुक्त दरारा होता व आहे, असे सांगत आपले पुरोगामी विचार बदलण्यासाठी कुणाला घाबरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यातून विभिन्न विचारसरणीच्या (प्रतिगामी) भाजपबरोबर जाणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. बदलत्या राजकीय परिस्थितीत लोकसभा लढणार नाही, आमदारकी सोडणार नाही, कर्जत-जामखेड शेवटपर्यंत सोडणार नाही, असे ते निक्षून म्हणाले. या वेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा सानप, प्रवक्ते माधव पाटील, युवक अध्यक्ष इमरान शेख आदी या वेळी उपस्थित होते.

Edited By- Ganesh Thombare

Sharad Pawar and Ajit Pawar
Rohit Pawar On Ajit Pawar : रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; चिंचवड पोटनिवडणुकीतील आघाडीच्या पराभवाला अजितदादाच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com