Rohit Pawar On Ajit Pawar : रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; चिंचवड पोटनिवडणुकीतील आघाडीच्या पराभवाला अजितदादाच...

NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar Group : अजित पवार सोडून गेले, हा पवार कुटुंबाचा विश्वासघात नसून....
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad : अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कथित फूट तथा बंडानंतर शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच सोमवारी अजित पवारांच्या बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी हे दोन गट नसून शरद पवारांचा एकच पक्ष आहे, हे स्पष्ट केले. फक्त काही जण स्वार्थासाठी बाहेर गेले आहेत असे ते म्हणाले.

कर्जत - जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीवर थेट भाष्य केले. पवार म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) सोडून गेले हा पवार कुटुंबाचा विश्वासघात नसून या कुटुंबाने जोपासलेल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा तो आहे, त्यावर तो घाला आहे.

Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar In Pusesavali: अजित पवारांनी दिली पुसेसावळीस भेट; म्हणाले, एकमेकांना आधार द्या, अशा गोष्टी परवडणार नाहीत...

पिंपरी-चिंचवडमधील ज्यांना शरद पवारांनी(Sharad Pawar) संधी आणि ताकद दिली, तेही अजितदादांबरोबर का गेले, या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, उद्योगनगरीत कुणाला तिकीट द्यायचे हे अजितदादाच ठरवत होते. त्यांच्यामुळेच आपण निवडून येतो,असे वाटत असल्यानेच शहरातील माजी नगरसेवक व आमदारही त्यांच्याबरोबर गेले असावेत. पण, स्वार्थासाठी तिकडे गेलेत ते संपतील,असे भाकीत त्यांनी केले.

चिंचवडच्या पोटनिवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराचा (राष्ट्रवादीचे नाना काटे) यांचा महायुतीने (भाजपच्या अश्विनी जगताप) यांनी पराभव केला. तेथील जबाबदारी अजिदादांवर होती, असे सांगत त्या पराजयाला तेच जबाबदार असल्याचे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.

'' पक्षच नाही, तर कुटुंबही फोडणारा भाजप आता...''

कथित पक्षफुटीनंतर खरा पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाला मिळेल, हा प्रश्न विचारला असता केंद्रीय निवडणूक आयोग हा भाजपच्या हातचे बाहुले झालेला असल्याने तेथे आपल्या बाजूने निकाल येईल असे वाटत नाही, अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली. पण कोर्टात तो आमच्याच बाजूने लागेल, असा दावा त्यांनी केला.

पक्ष आणि कुटुंबही फोडणाऱ्या भाजपचे साठ वर्षे राजकारणात असलेले शरद पवार हे बाप आहेत, असा सणसणीत टोला त्यांनी फोडाफोडीच्या त्यांच्या राजकारणावर हाणला. त्यांनी गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे यांना संपवले असून, हेच काम ते आता पंकजा मुंडेंबरोबर करीत आहेत, असा दावा त्यांनी केला. संविधानालाही तडा देण्य़ाचे काम ते करीत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी चढविला.

Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar Vs Rohit Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांची जोरदार एन्ट्री; पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यात अनेकांची घरवापसी

पिंपरी महापालिकेतील भाजपच्या गेल्या पाच वर्षांतील भ्रष्ट कारभारावर रोहित पवार यांनी या वेळी जोरदार हल्लाबोल केला. एकही नवीन काम त्यांनी केले नाही. उलट अडचणी वाढवल्या. डेंगी वाढला. शहरातील वाहतूक कोंडी वाढली. पालिकेची सत्तर टक्के टेंडर ही गुजरातच्या कंपन्यांना देण्यात आली. २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिलेल्या भाजपने तो दिवसाआड केला, अशी जोरदार तोफ त्यांनी डागली.

शहरात सुरू झालेली मेट्रो हीसुद्धा यूपीए सरकारच्या काळातील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २०१७ ला त्यांना आमच्याच पक्षातील काही विश्वासघातकी चार-दोन नेत्यांमुळे प्रथमच सत्ता मिळाली. आता मात्र ते पिंपरीच नाही, तर राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाचे कारण देऊन जाणूनबुजून घेत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar, Rohit Pawar
Hasan Mushrif On Gokul : 'गोकुळ'च्या सभेतील 'राड्या'वरून मुश्रीफांनी महाडिक गटाला फटकारलं; म्हणाले," अब्रू राज्याच्या वेशीवर..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com