Rupali Patil News : महापालिकेत पराभूत झालेल्या रूपाली पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; यावेळी महाराष्ट्रासह गोव्यातही कस लागणार...

Rupali Patil election comeback : मी लढणारी आहे लोकशाही जिवंत राहावी, कायदेशीर प्रक्रियेने कामकाज व्हावे, यासाठी जे जे करावे लागले ते मी केले आणि करणार, असे रुपाली पाटील पराभवानंतर म्हणाल्या होत्या.
Rupali Patil
Rupali PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांना देखील या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यासोबतच रूपाली पाटील ठोंबरे यांना देखील पराभवाचा धक्का बसला. प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 26 या दोन्ही प्रभागांमधून त्यांना मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं.

पाटील यांचा दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारांनी पराभव केला. निवडणूक निकालाच्या दिवशी रुपाली पाटील यांनी ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळा होत असल्याचा आरोप भाजप आणि प्रशासनावर केला. ईव्हीएम मध्ये गडबड घोटाळा करून भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यात येत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

निवडणुकीनंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतदार लोकांनी आम्हाला भरभरून मते दिले, पण मशीन बदलून जिंकणाऱ्या उमेदवार यांना जिंकवल्याचा आरोप केला. तसेच लोकशाहीचा गळा घोटून निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर करून जिंकणे मोठे काम नाही, हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाल्या होत्या.

Rupali Patil
Teachers Recruitment : ... तर नव्याने TET द्यावी लागणार! शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी, वय, प्राधान्यक्रमांच्या तरतुदींमध्ये बदल

मी लढणारी आहे लोकशाही जिवंत राहावी, कायदेशीर प्रक्रियेने कामकाज व्हावे, यासाठी जे जे करावे लागले ते मी केले आणि करणार. कोणाला स्टंट वाटावा, कोणाला अजून काही वाटावे, तर त्यांनी स्वतः लोकशाही टिकवण्यासाठी कायदेशीर कामकाज होण्यासाठी थोडं तरी आपलं योगदान देण्याचे काम करून समाजावर उपकार करावे. माझ्या प्रभाग 25 शनिवार पेठ महात्मा फुले मंडई मधील मतदार बंधू भगिनी वडीलधारी मंडळी यांनी पराभूत केले नाही. त्यांच्यासाठी कालही होते, आजही आहे आणि उद्याही त्याच ताकतीने राहील. असं रूपाली पाटील म्हणाल्या.

Rupali Patil
Shiv Sena Supreme Court : शिंदेंची धाकधूक वाढली, महापौर निवडीआधी सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा फैसला? असीम सरोदेंनी सांगितलं काय होणार?

सगळ्या राड्यानंतर आता रूपाली ठोंबरे पाटील एक वेगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या असल्याचं समोर आले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणूकीसाठी ॲड. रुपाली पाटील ठोंबरे महिला राखीव गट जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर कोर्ट मधून उभ्या राहिल्या आहेत. आता या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत दोन्ही राज्यांतील बार कौन्सिलचे सदस्य मतदान करतात. त्यामुळे पुन्हा एकदा रुपाली पाटील यांचा निवडणुकीत कस लागणार आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com