Sharad Pawar : काँग्रेसच्या स्थापनेची घोषणा पुण्याऐवजी मुंबईतून का? शरद पवारांनी सांगितला जुना किस्सा; म्हणाले, 'जन्म पुण्यातला, बैठकही बोलावली पण...'

Congress Establishment History: शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये काँग्रेसच्या स्थापनेच्या इतिहासाबाबत एक किस्सा सांगितला. 1885 ला काँग्रेसच्या स्थापनेची घोषणा पुण्यातून होणार होती.
Shard Pawar on Congress' Pune Connection
Shard Pawar on Congress' Pune ConnectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 17 Sep : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये काँग्रेसच्या स्थापनेच्या इतिहासाबाबत एक किस्सा सांगितला. 1885 ला काँग्रेसच्या स्थापनेची घोषणा पुण्यातून होणार होती. कार्यक्रम ही निश्चित करण्यात आला होता.

मात्र, ऐनवेळी कार्यक्रमाच ठिकाण का बदललं? याबाबतचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला आहे. पुण्यामधील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, 'आपण 'काँग्रेस'च्या नावाने लढतो, राष्ट्रवादी काँग्रेस! पण 'राष्ट्रवादी काँग्रेस' याच्यामागं विचारधारा आहे. ती विचारधारा गांधी- नेहरू-आझाद यांची विचारधारा आहे. ही विचारधारा मजबूत करायची आहे.

विशेषतः पुणे शहरामध्ये आपण इथे एकत्रित आहोत. माझ्या मते, पुणे शहराच्या 'काँग्रेस' विचारांच्या लोकांची जबाबदारी ही अधिक आहे. त्याचं कारण कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल. 1885 साली 'काँग्रेस पक्ष' स्थापन झाला. त्याचा निर्णय पुण्यामध्ये झाला.

Shard Pawar on Congress' Pune Connection
Raju Shetty Politics: राजू शेट्टी आक्रमक होताच केंद्र सरकार हालले, चार दिवसांत मिळणार कांदा उत्पादकांना पैसे!

'काँग्रेस पक्षा'ची स्थापना, जन्म हा पुण्यात झाला. बैठक बोलावली होती. पण दुर्दैवानं बैठक ज्या दिवशी बोलावली होती, त्याच्या आधी 3 दिवस पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. ही प्लेगची साथ आल्यामुळं इथं कुठलेही कार्यक्रम घेता आले नाहीत. म्हणून पुण्याचा निर्णय हा बदलला आणि तो मुंबईला नेला.

आज ज्याला 'ऑगस्ट क्रांती मैदान' हे जे ठिकाण आहे, तिथे 'काँग्रेस' नेली आणि तिथून 'काँग्रेस' ही जाहीर केली गेली. पण त्याचं मूळ हे पुण्यातलं होतं आणि पुण्यातलं असेल तर 'पुणेकर' म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी ही अधिक असल्याचं पवार म्हणाले.

Shard Pawar on Congress' Pune Connection
Nashik Onion Export Ban: नाशिकचा कांदा थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गाजला; निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रशासन गतिमान

तसंच आजचं पुणं आणि त्यावेळचं पुणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आज पुणं शहर बदललेलं आहे. तुम्ही सगळेजण पुण्यामध्ये राहता. आज रस्त्याने जाणं अवघड आहे, दळणवळणाची साधनं वाढली. देशामध्ये सगळ्यात जास्त 'टू व्हीलर्स' यासंबंधीची नोंद ही पुण्याची आहे.

अनेक गोष्टी आहेत, आज जुनं पुणं राहिलेलं नाही. एक काळ असा होता की, छोटी- छोटी घरं! आज लोक सांगतात तिथं 30 मजल्यांची इमारत, कुठे 40 मजल्यांची इमारत आणि यामुळे आज पुण्याचा चेहरा बदलला आहे. पण या सगळ्या बदलाच्या वेळेला त्याच्या गरजाही काही आहेत, असंही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com