Pune : पुण्याचे नाव 'गुन्हे' करायला हरकत नाही; शरद पवार पक्षाच्या महिला नेत्या आक्रमक

Rohini Khadse : आज (10 मार्च) पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले.
Rohini Khadse
Rohini KhadseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : "महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पुण्यात देखील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधी पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जायचं. आता पुणे तिथे गुन्हेच गुन्हे असं म्हणावं लागत आहे. त्यामुळे आता पुण्याचं नाव 'गुन्हे' करायला हरकत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली.

आज (10 मार्च) पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले. रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. या आंदोलनावेळी त्या बोलत होत्या.

Rohini Khadse
Pune NCP Andolan News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा, राष्ट्रवादीचं मेट्रो पटऱ्यांवर आंदोलन, काय घडलं?

आंदोलनादरम्यान खडसे म्हणाल्या, महिला अत्याचार झाल्यानंतर महिलांना खूप सहन करावा लागत आहे. त्यांची तक्रार वेळेत नोंदवून घेतली जात नाही. कारवाई उशीर होते. अनेक वर्षी न्याय मिळत नाही. पोलीस यंत्रणा गुन्हेगारांवर कडक कारवाई का करत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मत मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभन देण्यात आली.

Rohini Khadse
Pune NCP Andolan Update : राष्ट्रवादीचं आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

लाडक्या बहिणींच्या मानधनामध्ये पहिलाच अधिवेशनामध्ये वाढ करून देऊ असं सांगितलं होतं. पण ही वाढ मिळाली नसल्यानेही रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, महायुती सरकारमधील मंत्र्यांचा खरे तर सत्कार केला पाहिजेत. रोज उठायचे आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचे काम करत आहेत.

गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करते, ते म्हणतात की महिलांनी पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरची पावडर ठेवावी आणि तुमचे तुम्ही संरक्षण करा. असं वक्तव्य करून ते आम्हला महिलांचे काही देणं घेणं नाही. असं सांगत असल्याने टीकाही रोहिणी खडसे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com