NCP Sharad Pawar : खळबळजनक! एकापाठोपाठ शरद पवारांचे नेते 'टार्गेट'; देशमुखानंतर 'या' महिला नेत्याच्या पतीवर हल्ला

NCP SP leader Rekha Tingre's Husband Chandrakant Tingre Attacked: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना एकीकडे ताजी असतानाच आता पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे.
NCP Leader Chandrakant Tingre .jpg
NCP Leader Chandrakant Tingre .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना एकीकडे ताजी असतानाच आता पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोफा सोमवारी (ता.18)थंडावल्यानंतर अनेक धक्कादायक राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राचं वातावरण ढवळून काढलं आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या वडगाव शेरीमधील उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणाऱ्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर अज्ञातांनी मंगळवारी (ता.19) भरदिवसा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यांच्या गाडीच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या आहे. या हल्ल्यात चंद्रकांत टिंगरे जखमी झाले आहेत. याघटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका भागात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत.काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थित त्यांनी हा प्रवेशकरून वडगाव शेरीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचा पाठिंबा दर्शवला होता.

Summary

चंद्रकांत टिंगरे हे आपल्या वाहनातून एमएसईबी ऑफिसकडे जात होते.त्यांनी कार लावली आणि खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी प्रथम पाठीमागून कारवर दगड मारला. तेव्हा कार चालक घाईना उतरला व पाठीमागे गेले.त्याचवेळी समोरून देखील सिमेंटचा गट्टू काचेवर मारून तोडफोड केली.या दगडफेकीत चंद्रकांत टिंगरे हे जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे वडगाव शेरी परिसरात चांगलाच वातावरण तापलं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या हल्ल्यावरुन पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. या घटनेची पोलिसांक़ून कसून चौकशी सुरु आहे.

शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी मोठे डाव टाकले आहेत. अजितदादांच्या अनेक बड्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं. त्यात पुणे वडगाव शेरी मतदारसंघातील माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या या प्रवेशामुळे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याची चर्चा आहे.

अनिल देशमुखांवर हल्ला...

विदर्भातील काटोल मतदारसंघात सोमवारी (ता.18) माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदारसंघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत अनिल देशमुख कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com