Sharad Pawar : "कालपर्यंत इकडे होते, ते आज..."; इंदापूर विधानसभेबाबत शरद पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar On Indapur Assembly constituency : भाजप नेते हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
Sharad Pawar, Harshvardhan Patil
Sharad Pawar, Harshvardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 29 Sep : भाजप नेते हर्षवर्धन पाटील सध्या महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवाय ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

कालपर्यंत इकडे होते, ते आज इथे येत असल्याची दबक्या आवाजात लोकांमध्ये चर्चा आहे. शिवाय ही चर्चा इंदापूरमध्ये देखील असल्याचा मला निश्चय आहे, असं म्हणत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढला आहे.

तर ही दबक्या आवाजाची चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी असून याची नोंद आम्हा नेते लोकांना घ्यावी लागेल. यातूनच निर्णय घ्यावा लागेल, पण मी तुम्हाला एवढेच सांगतो, जो काही निर्णय घेतला जाईल तो संघटनेचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष, बाकीचे पदाधिकारी यांना विचारात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान पवारांनी यावेळी केलं.

Sharad Pawar, Harshvardhan Patil
Devendra fadnavis Politics: शिंदे, फडणवीसांनी नाशिकमध्ये फुंकला महायुतीच्या प्रचाराचा बिगुल!

जनतेच्या मनातील निर्णय घेणार

त्यामुळे जर हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तर पवार त्यांना प्रवेश देणार का? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने हर्षवर्धन (Harshvardhan Patil) पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

पितृपक्ष पंधरवडा संपताच पदाधिकाऱ्यांशी बोलून जनतेच्या मनातील निर्णय घेणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. तर कार्यकर्त्यांचा तुतारीचा आग्रह आहे. मात्र, सर्वांचा विचार करूनच लोकांशी चर्चा करून तुतारीवर लढायचे की अपक्ष त्याचा निर्णय घेणार घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sharad Pawar, Harshvardhan Patil
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नव्हे हत्या? आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

नेमकं प्रकरण काय?

इंदापूर मतदारसंघावर दावा करणारे हर्षवर्धन पाटील हे भाजपचे (BJP) नेते आहेत. तर या मतदारसंघात सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत त्यामुळे ही जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com