पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना या शहराचा कोपरा न कोपरा माहिती आहे. या शहरातील जनतेला विश्वास आहे की, अजितदादा या शहराला निधी देऊन न्याय देतील. त्यामुळे लोक पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता देतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. तसेच या वेळी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराचा देखील पाटील यांनी आढावा घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज पाटील यांनी पिंपरी-चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की ''पक्षातील प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता बोलला पाहिजे यासाठी ही संवाद यात्रा सुरू केली आहे. नव्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी कार्यकर्त्यांची कार्यकारिणी मोठी असली पाहिजे. पक्ष चांगल्या पद्धतीने चालवला पाहिजे. बूथ कमिटीच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे. प्रसंगी लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवायला हवी, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
जयंत पाटील ज्या पद्धतीने राज्यभरातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत त्या बद्दल त्यांचे मी आभार मानतो. सत्ताधारी पक्षाची झोप उडवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मी पूर्णपणे वेळ देईन, असे आश्वासन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.
या वेळी आमदार अण्णा बनसोडे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे, युवती जिल्हाध्यक्ष वर्षा जगताप, युवक जिल्हाध्यक्ष इमरान शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष यश साने, वसंत बोराटे, संध्या सोनवणे, निलेश पांढरकर, सचिन चिंचवडे, उत्तम आल्हाट आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.