Malegaon Sakhar Karkhana : अजितदादांना त्यांच्याच स्टाइलमध्ये मदननानांचा खडा सवाल; म्हणाले...

Madannana Deokate Nirawagaj Meeting : माळेगाव अध्यक्षपदाचं रान पेटलं; चर्चेनंतरच निर्णय घेणार, देवकातेंचे सूचक विधान
Madan Deokate, Ajit Pawar
Madan Deokate, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्ष संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच अजितदादा सत्तेत सहभागी झाले. यानंतर आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी 'आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हीच चूक आहे का?' अशा शब्दांत अजितदादांनी नाराजी जाहीर केली होती. आता त्याच स्टाइलमध्ये मदन देवकाते यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावरून आपली खंत बोलून दाखवली. "मी एका विशिष्ट जातीत जन्माला आलो म्हणून मला डावलण्यात आले का?", असा खडा सवाल मदननाना देवकातेंनी उपस्थित केला आहे. (Latest Political News)

माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्षपदी तानाजी देवकाते यांची निवड करण्यात आली. दरम्यान, कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी म्हणून पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, संचालक योगेश जगताप, ज्येष्ठ संचालक मदन देवकाते यांनीही तगडी 'फिल्डिंग' लावली होती. अजितदादांनी मात्र ज्येष्ठ, अनुभवी म्हणून अॅड. जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अॅड. जगतापांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर योगेश जगतापांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. मदननानांनी मात्र आपल्या निरावागज गावातील चिंतन सभेत दुजाभाव केल्याचा आरोप करत नाराजी जाहीर केली.

Madan Deokate, Ajit Pawar
Malegaon Sakhar Karkhana : प्रचंड ताकद पणाला लावूनही योगेश जगतापांचा पत्ता कट; 'माळेगाव' अध्यक्ष निवडीत नेमकं काय घडलं?

मदन देवकाते म्हणाले, 'गेल्या ४० वर्षांच्या राजकारणातील ३१ वर्षे कारखान्यासाठी काम केले. पक्षाने सांगितली ती भूमिका मन लावून पार पाडली. विरोधातील पॅनेल सत्तेत बसविण्यासाठी जिवाचे रान केले. विजयासाठी केलेल्या प्रयत्नांतून कुणालाही पदाची अपेक्षा असतेच. पक्षाशी कायम एकनिष्ठ राहूनही पद दिले जात नाही, यातूनच मनात प्रश्न निर्माण झाला की, एका विशिष्ट समाजात जन्माला आलो म्हणून मला डावलले का?'

कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष केशवबापूंना पाठिंबा असून, कुणावरही नाराज नसल्याचे देवकातेंनी स्पष्ट केले. 'मी आजपर्यंत कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे मनापासून पालन केले. अध्यक्षपदाबाबत पक्षश्रेष्ठींशी काहीवेळा चर्चा झाली होती. त्यातूनच पद मिळेल अशी आशा होती. मात्र, ते मिळाले नसल्याने खंत आहे. मी कुणावरही नाराज नाही', असेही सांगण्यास देवकाते विसरले नाहीत. (Maharashtra Political News)

Madan Deokate, Ajit Pawar
Ganesh Sakhar Karkhana : नगरच्या राजकारणात 'गणेश' ठरतोय कळीचा मुद्दा; काय आहे कारण?

गावातील सभेनंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, पुढील भूमिका ठरलेली नाही, असे देवकातेंनी सांगितले. ते म्हणाले, 'स्थानिक राजकीय कुरघोडीतून पद डावलल्याची आता माहिती मिळत आहे. आता पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा बोलणी सुरू आहे. यानंतर वरिष्ठांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. माझी बंड करण्याची प्रवृत्ती नाही. पदाधिकारी आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.'

मदन देवकातेंनी आपल्या भावुक भाषणात अजितदादांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याही नावाचा उल्लेख केला. 'आजपर्यंत अनेक ठिकाणी प्रामाणिकपणे काम केल्यानंतरही अपेक्षा असतानाही संबंधित संस्थावरील मोठी पदे देताना इतरांचा विचार केला गेला. वरिष्ठांनी थांब म्हटले की थांबलो. पक्षासाठी जिवाचे रान केल्यानंतरही मोठ्या पदाबाबत नेत्याला गळ घालायची का, नाही?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या वेळी ग्रामस्थांनी देवकांतेना जो निर्णय घ्याल त्याला पाठिंबा देऊ, असा शब्दही दिला आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Madan Deokate, Ajit Pawar
Pankaja Munde On Vaidyanath Factory: वैद्यनाथ कारखान्याच्या नोटिशीवर पंकजा मुंडे बोलल्याच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com