Narayangaon (Pune) : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आहे. मात्र, जुन्नर तालुक्यातील परिस्थिती वेगळी आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा अनुभव पाहता तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षशिस्त व पक्षहिताला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार अतुल बेनके यांनी दिला. (NCP will contest elections on its own in Junnar taluka : MLA Atul Benke)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वर्धापन दिनानिमित्त नारायणगाव येथे ध्वजवंदन आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जुन्नर बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे व संचालक यांचा सत्कार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आमदार बेनके बोलत होते.
आमदार अतुल बेनके (Atul Benke) म्हणाले की, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुक एकत्र झाली तरी निवडणुकीची रणनीती तयार केली आहे. प्रत्येक निवडणुकीची रणनीती वेगळी असते. कुकडी प्रकल्पाच्या पाण्याबाबत विरोधकांचे खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे.
कुकडी प्रकल्पाच्या फेरनियोजनात तालुक्यातील नद्यांवर असलेले ६८ कोल्हापूर बंधारे वगळण्यात आले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे हे फेरनियोजन आम्हाला मान्य नाही. कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपाबाबत मी सतर्क आहे. पुढील काळात पक्षाच्या नियमित बैठक घेतल्या जातील. तालुक्यातील बूथ कमिटीच्या अध्यक्षांनी सुचवलेले कामे प्राधान्याने केली आहेत, असे बेनके यांनी नमूद केले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यात २०२४ मध्ये सत्ता आणायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शंभर आमदार निवडून येणे आवश्यक आहे. मागील चार वर्षांत शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गासाठी ३० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सात वर्षे बंद असलेली बैलगाडा शर्यत सुरू केली. पाच बायपासचे कामे पूर्ण झाली. मोशी ते चांडोली फ्लाय ओव्हरच्या कामासाठी आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हे काम ऑक्टोबर महिन्यात सुरु होईल.
जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना तालुक्यात मजबूत आहे. तालुक्यात ग्रामपंचायत, सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असताना बाजार समिती निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. सत्ता आली तरी मी समाधानी नाही. याबाबत मी आत्मपारीक्षण केले आहे.
पांडुरंग पवार म्हणाले की, जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबूत आहे. स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवा. सोयीप्रमाणे राजकारण करू नका.
या वेळी शरद लेंडे, दिलीप कोल्हे, देवराम लांडे, रमेश मेहत्रे, राहुल गावडे, सुरेखा वेठेकर यांची भाषणे झाली. मेळाव्यास गणपतराव फुलवडे, बाजीराव ढोले, विनायक तांबे, राजश्री बोरकर, विलास पाटे, महादेव वाघ, बाळासाहेब बढे, रमेश भुजबळ, जयप्रकाश डुंबरे, गणेश वाजगे, अंकुश आमले, बबनराव तांबे, तुषार थोरात,पापा खोत, अर्चना ढोबळे, अशोक घोडके आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.