Pune District Bazar Samiti : राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्हा जिंकला; पण शहर गमावलं

NCP vs BJP : दौंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'फिफ्टी-फफ्टी'
Pune APMC
Pune APMCSarkarnama

Pune District Bazar Samiti : पुणे जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडल्या. या निवडणुकीत पाच बाजार समितींवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले. भोर, निरा येथे काँग्रेस पक्षाने वर्चस्व कायम राखले. तर पुणे (हवेली) आणि दौंड बाजार समितीत राष्ट्रवादी पक्षाला अनपेक्षीत मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यात वर्चस्व निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे (हवेली) बाजार समिती गमवाली लागली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा दबदबा कायम राहिला आहे.

Pune APMC
Latur District APMC News : जिल्ह्यात मतदारांचा कौल `फिप्टी-फिप्टी`, देशमुख-निलंगेकरांनी गड राखले..

पुण्यातील पुणे (हवेली), भोर, बारामती (Baramati), इंदापूर, दौंड, निरा, जुन्नर, खेड, मंचर, वडगाव मावळ या बाजार समित्याच्या निवडणुका पार पडल्या. त्यासाठी सरासरी ९४ टक्क मतदान झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप पुरस्कृत पॅनल समोरासमोर होते. दरम्यान, पुणे (हवेली) आणि इंदापूरमध्ये सर्वपक्षीयांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. तर दौंड येथे भाजप-राष्ट्रवादी (NCP-BJP) काँग्रेसला समान जागा मिळाल्याने पेच निर्माण झाला आहे.

Pune APMC
Sanjay Raut On Eknath Shinde : एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी खोके पाठवले; राऊतांचा गंभीर आरोप !

पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा असल्याचे या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाविकास आघाडीच्या (MVA) नेतृत्वातील पॅनलने बारामती, खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ, निरा, भोर येथे एकहाती सत्ता मिळविली आहे. तर पुणे बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी भाजपशी हात मिळवणी करून सर्वपक्षीय पॅनल स्थापन केला. त्या पॅनलने येथे सत्ता मिळविली आहे. दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्तेला भाजपने सुरूंग लावला आहे.

Pune APMC
Vajarmuth Sabha in Pune : 'मविआ' ची वज्रमूठ 'सैल' ? ; पुण्यातील सभेबाबत नाना पटोलेंचं सूचक विधान

बारामती, निरेत विरोधकांचा सुपडासाफ

बारामती आणि निरा बाजार समितीत महाविकास आघाडीच्या पॅनलने विरोधी भाजप व मित्र पक्ष पॅनलचा १८-० असा सुपडासाफ केला आहे. तर मंचर बाजार समितीत महाविकास आघाडीने १७-१ असा दणदणीत विजय मिळविला आहे.

Pune APMC
Big Decision of the State Govt: राज्य सरकारचा निर्णय; रस्त्यांच्या विकासासाठी नव्या महामंडळाची स्थापना

'या' बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

बाजार समिती निवडणुकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), आमदार दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, रमेश थोरात, विजय शिवतारे, संजय जगताप, बाळा भेगडे, सुनील शेळके, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil), दिलीप मोहिते, अतुल बेनके यांच्या समावेश होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com