Rupali Chakankar News: ''...म्हणूनच माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा!''; रुपाली चाकणकरांचं मोठं विधान

Maharashtra Politics : विधानसभेच्या २०१९ सालच्या निवडणुकीवेळीच मी उमेदवारीसाठी अर्ज दिला होता. मात्र...
Rupali chakankar - Devendra Fadnavis
Rupali chakankar - Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar Interview: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात इन्कमिंग आणि आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजणही इच्छुक आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटही राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत असून त्यांच्यातील काही नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्नशील आहे.

याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर चाकणकरांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे.

Rupali chakankar - Devendra Fadnavis
Raj Thackeray's New Car: राज ठाकरेंच्या नव्या कारची का होतेय चर्चा?

महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर 'सरकारनामा' विशेष या कार्यक्रमात बोलत होत्या. चाकणकरांनी यावेळी उर्फी जावेद, भाजप प्रवेश, खडकवासल्यातून उमेदवारी यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. चाकणकर म्हणाल्या,राष्ट्रवादीत गेली १६ वर्ष मी काम करतेय. या कालावधीत पवारसाहेबांनी मला चांगलं काम करण्याची संधी दिली. त्यांच्यामुळेच एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिला ते संविधानिक पदावरील अध्यक्षापदापर्यंतचा प्रवास शक्य झाला आहे असंही रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) सांगितलं.

Rupali chakankar - Devendra Fadnavis
Jitendra Awhad : 'सुडाचे राजकारण..' ; राष्ट्रवादी-शिंदे गटातील संघर्ष पेटला, आव्हाडांच्या नावाचा फलक...

चाकणकर म्हणाल्या, माझ्या भाजप(Bjp)प्रवेशाच्या चर्चा करताना विरोधकांना जास्त उत्साह वाटत असावा. पण कदाचित मुख्यमंत्री महिला आयोगाच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहणार होते. कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री प्रोटोकाँलनुसार महिला आय़ोगाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो. त्याचमुळे या चर्चा होत असतील. आणि पहिल्यांदाच सत्ताधारी एका पक्षाचे आणि महिला आय़ोगाच्या अध्यक्षा दुसऱ्या पक्षाच्या आहेत असं घडलं असावं. माझ्या भाजप प्रवेशाच्या विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत.पण मी कुठेही जाणार नसून राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण चाकणकरांनी यावेळी दिले.

Rupali chakankar - Devendra Fadnavis
Rohit Pawar News : शिंदे-फडणवीस सरकार बदला घेण्यासाठी सत्तेवर बसलंय : रोहित पवारांचा घाणाघात

मागच्यावेळीच उमेदवारी मागितली होती,पण...

विधानसभेच्या २०१९ सालच्या निवडणुकीवेळीच मी उमेदवारीसाठी अर्ज अजित पवारांकडे दिला होता. मात्र,माझी ज्यादिवशी मुलाखत होती. त्याच दरम्यान अगोदरच्या महिला प्रदेशाध्यक्षा पक्ष सोडून गेल्या. खरंतर निसर्ग मंगल कार्यालयात सर्वच इच्छुक उमेदवारांचीही मुलाखत होती.त्यात माझीही मुलाखत होती. पण आता खडकवासल्यातून आमदार होण्याची इच्छा चाकणकरांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com