PM Narendra Modi News : 'इंडिया'च्या चॅलेंजमुळे 'एनडीए' कामाला; पंतप्रधान मोदी मैदानात, खासदारांच्या आढावा बैठका घेणार

BJP Political News : विरोधकांनी `इंडिया` आघाडीव्दारे आव्हान उभे केल्याने २०२४ ची लोकसभा भाजपला गांभीर्याने घ्यावी लागली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक दहा महिन्यावर आल्याने केंद्रातील सत्ताधारी भाजप व त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेची हॅटट्रिक नोंदविण्याच्या जोरदार तय़ारीत आहेत. मात्र,यावेळी विरोधकांनी `इंडिया` आघाडीव्दारे आव्हान उभे केल्याने २०२४ ची लोकसभा भाजपला गांभीर्याने घ्यावी लागली आहे.त्यामुळे खुद्द मोदी मैदानात उतरले असून बुधवारी रात्रीपासून ते `एनडीए` खासदारांच्या आढावा बैठकांचे सत्र सुरु करणार आहेत.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे.त्यामुळे बहूतांश सर्व खासदार दिल्लीत आहेत.ही संधी साधून संसदेचे दररोजचे कामकाज संपल्यानंतर रात्री नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे खासदारांच्या दररोज दोन-दोन आढावा बैठका घेणार आहेत. २०२४ ला पुन्हा बहूमताने सत्तेत यायचा चंग त्यांनी बांधला आहे.तर,दुसरीकडे त्यांची ही हॅट्रिक चुकविण्यासाठी सारे विरोधी पक्ष `इंडिया`या आघाडीत एकवटले आहेत.

PM Narendra Modi
BJP Mission 48: लोकसभेसाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांची आज बैठक; फडणवीस देणार टीप्स

त्यांच्या या आव्हानामुळे मोदी आणि भाजप(BJP)ला २०२४ ची लोकसभा निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागली आहे. म्हणून त्यांनी जोरदार तयारी आतापासून सुरु केली आहे. त्याचा एक भाग म्हणून खासदारांच्या या आढावा बैठकांचे सत्र सुरु करण्यात आले आहे. त्यातून ते मतदारसंघाची ताजी स्थिती जाणून घेऊन गरज आहे,तिथे लगेच उपाययोजना करणार आहेत. अकार्यक्षम खासदारांची झाडाझडती घेऊन त्यांना जोरात कामाला लावले जाणार आहे.

बुधवारी रात्री पहिली बैठक ही उत्तर प्रदेशातील काशी, अवध आणि गोरखपूर भागातील 48 खासदारांची होणार आहे. मंत्री आणि अपना दलाच्या नेत्या अनुप्रिय पटेल आणि भाजपचे महेंद्र नाथ पांडे यांच्याकडे तिच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. (Loksabha Election)

PM Narendra Modi
Wai NCP News : शरद पवार हेच आमचे दैवत; वाई मतदारसंघाचा विकास फक्त अजितदादांमुळे : मकरंद पाटील

तर,त्यानंतरची बैठक ही तेलंगणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि अंदमान निकोबारच्या 96 खासदारांची होणार आहे. या बैठकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे ही उपस्थित असणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com