

Pune News : NEET-UG 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) पुण्यातील आणखी एका प्राध्यापिकेला शुक्रवारी (ता. २२) अटक केली. भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. सीबीआयने यापूर्वी पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाची प्राध्यापिका मनिषा मांढरे हिला अटक केली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात अटक झालेली ही तिसरी मनिषा आहे.
मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या प्राध्यापिकेचं नाव आहे. ही प्राध्यापिका सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशाला इथं कार्यरत आहे. सीबीआयनं या प्राध्यापिकेला प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील एक आरोपी असल्याचं म्हटलं आहे. या कारवाईमुळं देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट-यूजी २०२६ च्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मनीषा हवालदार या प्राध्यापिकेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्राध्यापिकेनं निवडक इच्छुक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात सीबीआयकडून देशभरात तपास सुरू असून, पेपरफुटीच्या साखळीतील विविध दुवे शोधण्याचे काम सुरू आहे. अटकेनंतर मनीषा हवालदारची कसून चौकशी करण्यात येत आहे. प्रश्नपत्रिका गळतीमागील इतर आरोपी आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.
या प्रकरणात पुण्यातील या तिसऱ्या प्राध्यापिकेवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी पहिल्यांदाच प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, प्रा. मनिषा मांढरे या दोन प्राध्यापकांना सीबीआयनं अटक केली आहे. त्यानंतर आता मनिषा हवालदार या नव्या प्राध्यापिकेची भर पडली. त्याचबरोबर मनिषा मांढरेची मैत्रीण ब्युटीपार्लर व्यावसायिक मनिषा वाघमारे हीला देखील सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.